Corona sakal
मुंबई

कोरोनासोबत साथीच्या आजारांची चाचणी सक्तीची!

सकाळ वृत्तसेवा

कोरोना संसर्गाची(Corona Infections) दुसरी लाट संपली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. त्यातच पावसाळा सुरू असल्याने पावसाळी आजार फैलावण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मलेरिया,डेंग्यू,एच1एन1 यांसारखे आजार डोकं वर काढू लागले आहेत.

मुंबई : कोरोना संसर्गाची(Corona Infections) दुसरी लाट संपली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. त्यातच पावसाळा सुरू असल्याने पावसाळी आजार फैलावण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मलेरिया,डेंग्यू,एच1एन1 यांसारखे आजार डोकं वर काढू लागले आहेत. त्यामुळे कोविडच्या रुग्णासोबत(Covid patients) पावसाळी आजाराचे रुग्ण वाढून परिस्थिती अधिक चिंताजनक बनू शकते. त्यामुळे खबरदारी(Corona Precautions) म्हणून पालिका रुग्णालयांमध्ये(BMC Hospitals) कोरोना बाधित रुग्णांची मलेरिया,डेंग्यू, एच1एन1 चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. पावसाळा असेपर्यंत या चाचण्या करण्यात येणार आहेत.( Monsoon Infectious disease tests must along with Corona test)

कोविड सोबत सध्या पावसाळी आजार डोकं वर काढू लागले आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्यास पालिकेने कंबर कसली आहे.शहरात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असतानाच पावसाळ्यातील साथीच्या आजाराची शक्यता लक्षात घेत पालिकेने कंबर कसली आहे. कोरोना रुग्णांसाठी बेड सज्ज करत असतानाच साथीच्या आजारासाठी रुग्णशय्या आरक्षित ठेवले आहेत. नॉन कोविड रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडेही पालिकेने लक्ष वेधले आहे.

सायन रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड अशा रुग्णासोबत साथीच्या आजाराची व्यवस्था केली आहे. सध्या कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे.मोठ्या कोविड केंद्रातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. नायरमध्येही साथीच्या आजारासाठी 300 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

साथीच्या आजारांसाठी पालिका सज्ज असून नागरिकांनीही साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती औषधोपचार टाळावेत आणि तपासणीसाठी रुग्णालयात जावे. पालिका गरजेनुसार बेडची व्यवस्था वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशी माहिती पालिकेच्या मुख्य रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

कोरोना संसर्गाची लक्षणं आणि मलेरिया,डेंग्यू, डेंग्यू,एच1एन1 या आजाराची लक्षणं एकसारखी जाणवतात. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला कोरोनासह मलेरिया,डेंग्यू,एच1एन1 यासारख्या आजाराची शक्यताही असू शकते. त्यामुळे कोरोनासह इतर चाचण्याही करण्यात येत आहेत. कोरोना सह इतर आजारांचे निदान झाल्यास रुग्णांवर कोरोनासह इतर आजारांचे वेळेत निदान व उपचार मिळतील अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT