Petrol_Diesel 
मुंबई

Petrol-Diesel : मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

Monsoon Session Interim Budget 2024 : मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार आहे. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यामुळं मुंबईकरांना काहीसा दिला मिळणार आहे. (Monsoon Session Interim Budget 2024 Petrol Diesel will be cheaper in Mumbai Navi Mumbai Thane announced by Ajit Pawar)

अजित पवारांनी घोषणा करताना सांगितलं की, इंधनावरचा कर हा २४ टक्क्यांवरुन २१ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळं ३ टक्क्यांनी करात कपात करण्यात आली आहे. यामुळं मुंबई महानगर प्रदेश अर्थात एमएमआर भागात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. त्यानुसार पेट्रोलचा दर हा ६५ पैसे आणि डिझेलचा दर हा अंदाजे २ रुपये ०७ पैसे प्रतिलिटर कमी होणार आहे, असं यावेळी अजित पवार यांनी जाहीर केलं.

दरम्यान, राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प होता. खरंतर त्याला इलेक्शन बजेट म्हणूनही संबोधलं गेलं आहे. कारण या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. समाजातील सर्वच वर्गाला खूष करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आल्याचं दिसतंय. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेती कृषी पंपाचा बिल माफ करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुंबईत पेट्रोल-डिझेलवरील कर कमी होणार आदी घोषणांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT