मुंबई : शहरातील वरळी, धारावी हे कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट ठरले होते. महापालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नानंतर येथील रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्याही नियंत्रणात आल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र धारावी वगळता मुंबईतील 10 वस्त्यांनी महापालिकेची चिंता वाढली आहे. या दहा वस्त्यांमध्ये कोरोनाचे प्रत्येकी 250 पेक्षा जास्त रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. सहा ते सात लाख लोकसंख्या असलेल्या धारावीत आतापर्यंत 2500 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागांमध्येही 250 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
घाटकोपर परिसरातील वस्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. घाटकोपर एन प्रभागातील 16 वस्त्या प्रतिबंधित असून त्यात 1 लाखाहून अधिक घरे आहेत. रमाबाई वसाहत आणि कामराजनगरमधील 1 लाख 11 हजार रहिवाशी प्रतिबंधित क्षेत्रात असून 445 रुग्णांची नोंद आहे. तर घाटकोपर पश्चिम येथील आझादनगर, पारसीवाडी, चिरागनगरमध्ये 38 हजार नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात असून तेथे 315 रुग्ण आढळले आहेत. शिवाय येथून जवळच असलेल्या बर्वेनगर, रामजीनगर, भटवाडीतील 36 हजार 500 नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात असून तेथे 436 रुग्ण नोंदवले गेले आहेत. इंदिरानगर गावदेवी रोड येथे 286 रुग्ण आहेत. तर वडाळा येथील संगमनगर परिसरातील 36 हजार नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात असून येथे 248 रुग्णांची नोंद आहे.
पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...
102 घरात 120 रुग्ण
भांडूप येथील साई हिल परीसारतील 102 घरांमध्ये 120 रुग्ण आढळले आहेत. येथे 264 नागरिकांची वस्ती आहे. तर विक्रोळी हरियाली व्हिलेजमधील एका भागातील 102 घरांमध्ये 115 रुग्ण नोंदवले आहेत.
मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...
पश्चिम उपनगरातील हॉटस्पॉट
वर्सेावा यारी रोड येथील रामदेव नाईक चाळीत 365 रुग्ण आढळले असून 25 हजार नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. खारदांडा या कोळीगावात 357 रुग्णांची नोंद असून 56 हजार 226 नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. गोळीबार सांताक्रुझ येथील 48 हजार नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात असून येथे 293 रुग्ण आढळले तर सांताक्रुझ येथील गावदेवी डिमेलो कंपाऊडमधील 28 हजार नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात असून येथे 301 रुग्णांची नोंद आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.