crematorium 
मुंबई

बापरे ! काळा धूर आणि प्रचंड दुर्गंधी; दादरकर म्हणतायत आता बास, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांचे मृतदेह ठेवण्यासाठीही जागा अपुरी पडत आहे. काही कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठीही येत नाहीयेत त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कसे असा प्रश्न सध्या प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे या मृतदेहांवर शहरातल्या काही प्रमुख स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र आता यामुळे दादरमध्ये राहणाऱ्या लोकांचा श्वास कोंडायला सुरुवात झाली आहे. 

मुंबईत  कोरणग्रस्तांची आणि त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतेय. त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीवर मोठा ताण पडलाय. यामुळे आता स्मशानभूमीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होण्यास सुरुवात झालीये. अंत्यसंस्कारांनंतर निर्माण होणारा काळा धूर आता संपूर्ण परिसरात पसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवतायत असं त्यांचं म्हणणं आहे.  

"या आधी इतकी वाईट परिस्थिती कधीच नव्हती. कित्येक वर्षांपासून या स्मशानभूमीजवळ राहतो आहे मात्र इतकी दुर्गंधी कधीच आली नाही", असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. "स्मशानभुमीनजीक घर असल्यामुळे निर्माण होणारा काळा आणि दुर्गंधी धूर थेट आमच्या घरात शिरतो. त्यामुळे आम्हाला इतक्या उकाड्यातही दिवसभर दारं-खिडक्या बंद कराव्या लागतायत.आमचं किचन स्मशानभूमीकडे असल्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, " असं देखील इथल्या महिलांनी सांगितलंय. 

घरासमोर फेकतात मास्क आणि ग्लोव्स: 

"मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला आलेले रुग्णालयाचे कर्मचारी आणि मृत व्यक्तीचे नातेवाईक अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या तोंडावरचे मास्क आणि त्यांचे ग्लोव्स काढून आमच्या घरासमोरच रस्त्यावर फेकतात. परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठीही बाहेर पडत नाहीत. बीएमसीनं या परिसरात सॅनेटाईझेशन करावं," अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. 

पूर्ण बिल्डिंग प्लॅस्टिकनं गुंडाळली: 

"स्मशानभूमीतून तेलकट आणि काळे कण आमच्या घरात, बिल्डिंगवर आणि गाड्यांवर येतात. त्यामुळे आम्ही यापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण बिल्डिंगला प्लास्टिकनं गुंडाळण्याचा निर्णय घेतला. तसंच आम्ही याबाबत इथल्या नगरसेविका विशाखा राऊत यांना याबाबत माहिती दिली आहे," असं देखील एका नागरिकानं सांगितलंय. 

सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत सतत होतात अंत्यसंस्कार: 

"या स्मशानभूमीत सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत कोरोनग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. खरं म्हणजे दोन अंत्यसंस्काराच्या दरम्यान २-६ तासांचा कालावधी आवश्यक असतो. मात्र मृतदेह जास्त असल्यामुळे हे शक्य होत नाहीये. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि धूर पसरतो आहे. या स्मशानभूमीत कमी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतील अशी व्यवस्था करणं आवश्यक आहे," असं नगरसेविका विशाखा राऊत यांनी म्हंटलंय.

आतापर्यंत तब्बल १७० मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दररोज तब्बल १५ - २० मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात. त्यामुळे इथल्या लोकांचा श्वास कोंडला आहे.  

more mortal brought in coming in shivaji park crematorium read full story  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT