मुंबई : शिवडी ते न्हावा शेवा जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूचं उद्घाटनं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. पण या कार्यक्रमाबाबत एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १३०० हून अधिक लोकांना बराच काळ पाण्याविना उन्हात उभे राहिल्यानं जुलाबाचा त्रास झाला तसेच डिहायड्रेशनमुळं चक्कर आल्याची घटना घडली होती. हिंदुस्तान टाईम्सनं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं आहे. (more than 1300 people fell ill during atal setu inauguration need know what really happened)
देशातील सर्वात लांब पूल
भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल अशी ओळख असलेल्या या अटल सेतूचं उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितती पार पडलं. नवी मुंबई विमानतळाच्या मैदानावर आयोजित या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने लोक जमले होते. पण बराच काळ पाण्याविना उन्हात उभं रहावं लागल्यानं तब्बल 1,300 जणांना जुलाबाचा त्रास झाला. (Marathi Tajya Batmya)
आरोग्य अधिकाऱ्यांनी काय म्हटलंय?
याबाबत आरोग्य अधिकारी म्हणाले, "शहरातील एवढ्या मोठ्या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित असताना अशी घटना घडणं सर्वसाधारण आहे. यावेळी कार्यक्रमाच्या बाजुलाच तात्पुरत्या उभारलेल्या रुग्णालयात आजारी पडलेल्या लोकांवर उपचार करण्यात आले. यांपैकी दोन लोकांना चक्कर आल्याने आणि डिहायड्रेशनने रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं, दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला" (Latest Marathi News)
तात्पुरता दवाखाना उभारला
कार्यक्रमादरम्यान अशी कोणतीही घटना घडल्यास, जिल्हा आणि राज्याच्या आरोग्य विभागानं कार्यक्रमाच्या ठिकाणी 70 रुग्णवाहिकांसह रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधांमध्ये अतिरिक्त खाटा तयार ठेवण्यात आल्या होत्या. (Latest Maharashtra News)
कार्यक्रमादरम्यान पिण्याचं पाणी उपलब्ध न झाल्यानं तसेच उष्णतेमुळं अनेकांना पित्त, जुलाब, चक्कर येणं, डाहायड्रेशन अशी लक्षणे जाणवली. या सर्व लोकांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार देण्यात आले तसेच अनेकांना ओआरएस, ग्लुकोज आणि हलका आहार देण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.