digha sakal
मुंबई

Digha Railway Station: दिघागाव रेल्वे स्थानकातून आठ दिवसांत लाखाहून अधिक नागरीकांनी केला प्रवास

More than one lakh citizens traveled from Dighagaon railway station in eight days: ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान नव्याने सुरू झालेल्या दिघागाव रेल्वे स्थानकातून आठ दिवसांत तब्बल ७ लाख ९२ हजार ४५७ रुपयांचा महसूल रेल्वेला मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

Digha Railway Station: ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान नव्याने सुरू झालेल्या दिघागाव रेल्वे स्थानकातून आठ दिवसांत तब्बल ७ लाख ९२ हजार ४५७ रुपयांचा महसूल रेल्वेला मिळाला. या स्थानकातून आतापर्यंत १ लाख ८७ हजार ९८३ प्रवाशांनी प्रवास केला असून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतच आहे.

नवी मुंबई शहरातील दिघा परिसर, ऐरोली, रबाळे आणि घणसोली भागात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा, मुलुंड, भांडूप भागातून प्रवास करणारे लाखो प्रवासी ठाणे स्थानकातून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईत जात असतात. तसेच नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे.

तसेच पूर्वी स्थानक नसल्याने दिघा, विटावा, कळवा भागातील प्रवाशांना ऐरोली किंवा ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे ठाणे आणि ऐरोली स्थानकात प्रवाशांचा अतिरिक्त भार वाढत होता; पण दिघा स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार कमी झालेला आहे.

राजकीय श्रेयासाठी लोकार्पण लांबणीवर


आठ महिन्यांपूर्वी दिघा रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले होते; पण राजकीय श्रेयासाठी या रेल्वे स्थानकांचे उद्घाटन लांबणीवर गेले होते. अखेर १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थानकाचे ऑनलाईन लोकार्पण झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT