मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. या बातमीने कदाचित तुमचा काहीसा मुडऑफ देखील होऊ शकतो. कारण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले गेले आहेत. रात्री ११ वाजेनंतर कोणत्याही हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी नसणार आहे. सोबतच कोरोनामुळे यंदा नाईट कर्फ्यू देखील आहे. त्यामुळे चारपेक्षा अधिकांना रात्री अकरा वाजेनंतर रस्त्यावर फिरण्यास अनुमती नाही. अशात तुम्ही जर रात्री बिल्डिंगच्या गच्चीवर यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करायच्या मूडमध्ये असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या टेरेसवर काय चालू आहे, यावरही पोलिस यंदा बारीक नजर ठेवणार आहेत.
Bullet Train Breaking : भूसंपादनासाठी होणाऱ्या विलंबामुळे बुलेट ट्रेन सुरवातीला गुजरापतपर्यंत धावण्याची शक्यता
मुंबईत ३१ तारखेला होणाऱ्या गच्चीवरील पार्ट्यांवर मुंबई पोलिसांची ड्रोनद्वारा नजर असणार आहे. त्यामुळे यंदा गच्चीत पार्टी करायचा तुमचा प्लॅन बनत असेल तर तो तात्काळ रद्द करा. कारण आता मुंबई पोलिसांचे ड्रोन आत तुमच्या गच्चीवर भिरभिरून गस्त घालणार आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री अनुचित प्रकार होऊ नयेत आणि नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी ३५ हजार पोलिस मुंबईच्या रस्त्यावर असणार आहेत. यंदा मद्यपी वाहन चालकांची ब्रेथ ऍनालायझर टेस्ट होणार नाहीये. मात्र, मद्यपी वाहन चालकांना जवळच्या रुग्णालयात नेऊन त्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे.
काय आहेत नियम :
more than thirty five thousand police will be present on the roads of mumbai on 32st night
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.