मुंबई : एसटी महामंडळाचे आर्थिक दिवाळे निघाल्याने मालमत्ता तारण ठेऊन दोन हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली होती. मात्र, एसटीच्या ताब्यात असलेल्या बहुतेक जमिनी राज्य शासनाच्या असून त्या लिजवर असल्याने आणि अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महत्त्वाची बातमी : राजेश टोपे म्हणालेत, "दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?
मार्च महिन्यापासून अद्याप सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे एसटीच्या उत्पन्नावर प्रचंड परिणाम झाला आहे. लॉकडाऊन नंतर एसटीची प्रवासी सेवा सुरू केली असली तरी, पूर्ण क्षमतेने अद्याप प्रवासी वाहतूक होत नसल्याने, एसटीचा आर्थिक गाडा रस्त्यावर आला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे अखेरच्या टप्यात राज्य सरकारने 1 हजार कोटीचे विशेष अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली. त्यामुळे एसटीकडे शिल्लक रक्कमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन दिवाळी पूर्वीच करण्यात आले.
मात्र, आता पुन्हा नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे एसटीची पूर्णक्षमतेने प्रवासी वाहतूक न झाल्यास एसटी पुन्हा आर्थिक संकटात सापडू शकते. त्यासाठी बस स्थानक, आगार, जमिनीच्या तारणाची प्रक्रिया करून लवकरच कर्ज घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असताना, प्रत्यक्षात एसच्या बसेस तारण ठेऊन कर्ज घेण्यात येणार असल्याचे एसटीचे अधिकारी सांगत आहे.
महत्त्वाची बातमी : भाजपला पुन्हा मोठा दणका; उद्या आणखी एक नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश!
राज्याच्या एक हजार कोटीचे सहाय्य प्रलंबित
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणि विविध खर्चांसाठी एक हजार कोटीच्या विशेष आर्थिक सहाय्याची घोषणा केली होती. मात्र, एसटी महामंडळाला अद्याप हे आर्थिक सहाय्य मिळालेच नसल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
( संपादन - सुमित बागुल )
mortgage of lands by ST is facing technical errors so ST is focusing on mortgaging buses
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.