मुंबई

आता MSEB देणार मोठा शॉक, 'हा' निर्णय झाला तर समजा दुष्काळात तेरावा महिना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई आणि उपनगरांसाह संपूर्ण राज्यभरात वीजेचे दर महागण्याची शक्यता आहे. महावितरणाने तब्बल ५९२७ कोटींच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक मंडळाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील गरीब जनतेवर या दरवाढीचा ताण येण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा फटका राज्यातील तब्बल ३ लाखांपेक्षा जास्त लोकांना बसण्याची शक्यता आहे.  दररोज महागाईचा आलेख वाढतोय, त्यामुळे हा निवार्णाय झाला तर सामान्य जनतेला दुष्काळात तेरावा महिना सहन करायला लागणार आहे.  

मोठी बातमी - फ़ायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?

दरवाढ कुणासाठी ?
या दरवाढीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील गरीब आणि सर्वात कमी वीज वापरणार्‍या जनतेला बसणार आहे. दरमहा १०० युनिट पर्यंत वीज  वापरणार्‍या ग्राहकांसाठी तब्बल ८ टक्क्यांची दरवाढ होणार आहे. याउलट दरमहा ३०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणार्‍या ग्राहकांसाठी ही दरवाढ नसणार आहे. त्यामुळे या दरवाढीचा भार गरीब जनतेवर पडताना पाहायला मिळेल.

मोठी बातमी - मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले

वीजदरातून महावितरणाला अधिक महसूल उपलब्ध व्हावा म्हणून ही दरवाढ केल्याची माहिती मिळतेय. आतापर्यंत महावितरणाला ७५ हजार कोटींचा महसूल उपलब्ध होत होता. मात्र, या दरवाढीनंतर आता महावितरणाला तब्बल ८२ हजार ९२५ कोटींचा महसूल उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित दरवाढ ही दरवाढ मूळ महसुलाच्या ५.८ टक्के इतकी असणार आहे.

घरघुती वीज ग्राहकांनाही बसणार दरवाढीचा फटका :
या दरवाढीचा फटका सामान्य घरघुती वीज ग्राहकांनाही बसण्यार आहे.  कारण घरघुती वीज आकार ९० रूपयांवरून ११० रुपये करण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. 

मोठी बातमी - उल्हासनगरमध्ये सैराट... भाऊजीला घातल्या गोळ्या

महावितरणाकडून या दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक मंडळाला पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. मात्र हा प्रस्ताव मंजूर झाल्यास हा सर्वांसाठी शॉक असणार आहे. 

MSEB may increase its tariff rates in mumbai and maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT