मुंबई : कोरोनाच्या दुसर्या लाटेतून (Corona Second Wave) अद्यापही दिलासा मिळत नसून म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरशीने महाराष्ट्रात (Maharashtra) चिंता वाढवली आहे. या संसर्गामुळे, एकूण प्रकरणांपैकी 12 टक्के मृत्यू झाले आहेत. या आजारामुळे आतापर्यंत एकूण 1125 जणांना आपला जीव (Deaths) गमवावा लागला आहे. तर मुंबईत (Mumbai) आतापर्यंत काळ्या बुरशीमुळे 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून बरे झाल्यानंतर, मधुमेह ग्रस्त (Diabetes) लोकांमध्ये काळ्या बुरशीचे संक्रमण होण्याचा धोका वाढला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9,272 लोकांना काळ्या बुरशीची लागण झाली असून त्यापैकी 12 टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 4902 म्हणजेच 53 टक्के लोक या गंभीर आजाराने बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. (Mucormycotic deaths all details infected patients and nagpur region-nss91)
मुंबईत आतापर्यंत 620 लोकांना या आजाराची लागण झाली असून त्यापैकी केवळ 135 लोक बरे झाले आहेत. तर 380 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात 3080 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
10% रुग्णांनी घेतले अपूर्ण उपचार
राज्यातील काळ्या बुरशीच्या रुग्णांना बरे करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही कसर सोडली जात नाहीत. महागडी औषधे व शस्त्रक्रिया करून डॉक्टर रुग्णांना बरे करण्यात व्यस्त आहेत. असे असूनही, 965 (10%) रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय रुग्णालय सोडून अपूर्ण उपचार घेतले.
टाॅप 5 जिल्हे
राज्यात असे पाच टाॅप जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
राज्यात सर्वाधिक काळ्या बुरशीचे रुग्ण नागपुरात आढळले आहेत. नागपूरमध्ये 1517, पुण्यात 1,299 औरंगाबादमध्ये 1041, नाशिकमध्ये 634 आणि मुंबईमध्ये 620 रुग्ण आतापर्यंत या आजाराने ग्रस्त आहेत.
उशिरा निदान झाले तर म्यूकरमायकोसिस हा घातक आजार आहे. म्युकरमायकोसिसमध्ये 50 टक्के मृत्यूदर आहे. मे, एप्रिल आणि जूनमध्ये केसेस वाढले होते. आता रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे, ज्यांना कोविड होऊन गेला आहे त्यांनी लक्षणांकडे लक्ष द्यावे.
डाॅ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी
हे महत्त्वाचे-
- जोखमीच्या कारणांवर लक्ष देणे गरजेचे आहे.
- ज्या व्यक्तीस कोविड होऊन गेला आहे आणि सोबत डायबिटीस आहे त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात असली पाहिजे.
- ऑक्सिजनवर एखादी व्यक्ती दिर्घकाळ असेल तर त्यांच्यातही म्युकरमायकोसिसचा संसर्ग वाढतो.
- स्टिरॉइड्सचा वापर ही योग्य प्रमाणात झाले पाहिजे.
- लक्षणांवर लक्ष ठेवून उपचार केले गेले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.