मुंबई

कुछ तो बडा करना है! च्या नादात अडकले सचिन वाझे?

पूजा विचारे

मुंबई: ९० च्या दशकात ६० हून अधिक एन्काऊंटर केलेल्या सचिन वाझेंची दबदबा त्यावेळी भरपूर होता. मात्र ख्वाजा युनुस प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सचिन वाझेंची प्रतिमा डागाळली. ९० च्या दशकातला तोच दबदबा वाझेंना पुन्हा करायचा होता.

अशातच खात्यात आल्यानंतर वाझेंना CIU या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली. हे खातं आयुक्तांच्या महत्वाच्या खात्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे याच खात्यात महत्वाचे गुन्हे वर्ग करण्यात आल्याने कधीही चर्चेत नसलेले CIU पथक वाझेंमुळे चर्चेत आलं. 

डीसी अवंतिका केस, फेक इन्स्टाग्राम फॉलोअर, ऋतिक रोशन बनावट ईमेल आयडी, TRP हे महत्वाचे गुन्हे सोपवले होते. यातून वाझे पून्हा चर्चेत आले खरे, मात्र अंबानीच्या धमकीच्या पञात "कुछ तो बडा करना है!" असं वाक्य लिहिण्यात आलं होतं.  यावरून पुन्हा चर्चेत येण्यासाठी वाझेंनी हे कृत्य केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत सचिन वाझे? 

1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झाली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणा-या वाझे  ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. 

त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह 1  पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली. वाझे यांच्यासर इतर विविध प्रकरणांमध्ये निलंबित 18 पोलिसांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं होते.

Mukesh Ambani explosives case how Sachin Waze stuck this issue here details

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

Vicky Kaushal : विकी कौशलने घेतला पुष्पा 2चा धसका ; छावाची रिलीज डेट बदलणार ?

Latest Marathi News Updates live : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500 च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे आयटी शेअर्स तेजीत

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

SCROLL FOR NEXT