Uddhav Thackeray Mukesh Ambani Esakal
मुंबई

Mukesh Ambani Uddhav Thackeray: सर्वात मोठी बातमी! अनंत आणि मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मातोश्रीवर नेमकं काय घडतेय?

आशुतोष मसगौंडे

उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती समोर आहे. दरम्यान अंबानी पिता-पुत्र ठाकरे यांच्या भेटीसाठी का गेले आहेत याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

याचबरोबर काही दिवसांत विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अंबानी पिता-पुत्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने यासाठी राज्यातील विविध भागांत दौरे सुरू करत प्रचाराला सुरूवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा केला होता. आता ठाकरे पुणे आणि मावळ भागातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

एककडे अंबानी कुटुंब उद्योग तर दुसरेकडे ठाकरे कुटुंब राजकारणा आहे. असे असूनही दोन्ही कुटुंबियांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे पाहायला मिळते. कारण अंबानी आणि ठाकरे यांच्यात कायम भेटी होत असतात. मुकेश अंबानी यापूर्वीही अनेकवेळा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेल्याचे पाहायला मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Helicopter Crash: 'या' पाच कारणांमुळे होतं हेलिकॉप्टर क्रॅश, विधानसभेच्या धामधुमीत नेत्यांनी 'अशी' काळजी घ्यावी

PM Modi In Thane: पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, 12 तास रहदारी राहणार बंद

Google Photos Magic Editor : प्रोफेशनल फोटो एडिटिंग करायचंय? मग चिंता कशाला, वापरुन बघा गुगलचं मॅजिक टूल

Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा; नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत धावणार मेट्रो!

Stock Market: इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरातील बाजार हादरले; भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT