महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने मुंबईत मंगळवारी सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला.
मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने मुंबईत मंगळवारी सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. डीआरआयने केलेल्या कारवाईत 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मुंबई डीआरआयच्या माहितीनुसार हे सोने परदेशातून वेगवेगळ्या हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून मुंबईत आणण्यात आले होते. डीआरआयने यासोबत 20 लाखांची रोकडही जप्त केली. सोने वितळवणाऱ्या दुकानाच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या माहितीनुसार, मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो कॉम्प्लेक्स, मुंबई मधून सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणांशी संबंधित तपासादरम्यान, डीआरआय मुंबईच्या अधिका-यांना गुप्त माहिती प्राप्त झाली. या हवाला प्रक्रियेत परदेशी नागरिकांचा समावेश असलेले एक सिंडिकेट सामील असल्याचे अधिकाऱ्यांना तपासात समजले.या माहितीआधारे सोमवार, 23 जानेवारी रोजी अधिकार्यांनी कारवाई केली. तस्करी केलेल्या सोन्याचे वितळणे आणि त्यावर प्रक्रिया केली जात होती त्या परिसराची झडती घेण्यात आली. या परिसराची कसून झडती घेतली असता प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर 36 किलोपेक्षा जास्त बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले.
यापूर्वी 18 जानेवारी रोजी डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांना अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून 4.54 कोटी रुपये किमतीचे 8.230 किलो सोन्याची पेस्ट जप्त केली होती. संशय येऊ नये यासाठी बहुतेक सोने प्रवाशांनी त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवले होते, त्यामुळे लपवलेले सोने शोधणे कठीण झाले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.