शहीदांना अभिवादन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिवादन कार्यक्रमात पोलिस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजवत आदरांजली वाहिली.
मुंबई - मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात शुक्रवारी 14 पूर्ण झाली. यावेळी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शहीदांना अभिवादन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिवादन कार्यक्रमात पोलिस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजवत आदरांजली वाहिली. सर्व मान्यवर, गणवेशातील अधिकारी व पोलिस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. यावेळी राज्यपालांनी देखील उपस्थित हुतात्मा पोलिस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा आजही भरल्या नाहीत. या हल्ल्यात अनेक पोलीस जवांनी जीवाची बाजी लावत मुंबईकरांचे प्राण वाचवले. मात्र यावेळी लढताना करकरे, कामटे, साळस्कर या पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण आले. त्यांच्या कर्तृत्त्वाची आणि त्या काळ्या दिवसाची आजही आठवण काढली तरी मनात दहशत निर्माण होते.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शहिदांना अभिवादन करताना नवीन वादाला सुरुवात झाली आहे. शहिदांना पादत्राणे घालून अभिवादन केल्यामुळे राज्यपालांवर टीका होत आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलने केली गेली आहेत. त्यांनी चप्पल घालून अभिवादन केल्यामुळे ते पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.