मुंबई - नागपूर - शिर्डी सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकतेच समृध्दी महामार्गाला १०० दिवस पूर्ण झाले असताना सुमारे ९५० अपघात झाल्याची चर्चा झाली होती.
मात्र, अपघाताची आकडेवारी खोटी असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे. अधिकृतपणे समृध्दी महामार्गावरील नागपूर, औरंगाबाद आणि पुणे विभागात एकूण २५३ अपघात झाले असून, ३१ मार्च पर्यंत २८ मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांच्या रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात नागपूर विभागात झाले आहे.
समृध्दी महामार्गावर वेग मर्यादा ताशी १२० आहे. शिवाय सध्यास्थितीत समृध्दी महामार्गावर फार ट्रॅफिक नसल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याच्या घटना,
किंवा वन्यजीव प्राणी रस्त्यांवर येत असल्याने अपघातास कारण ठरत आहे. विदर्भात सर्वाधिक वन्यजीव प्राण्यांचे स्थळ असल्याने नागपूर विभागात सर्वाधिक अपघात दिसून येत आहे. त्यातही सर्वाधिक अपघात आणि मृत्यूचे प्रमाण मलकापूर दरम्यान झाल्याचे पुढे आले आहे.
नागपूर विभागातील खुर्सापुर, जाम, धामणगाव रेल्वे, आमनी , मलकापूर मिळून १२ जीवघेण्या अपघातामध्ये १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २८ गंभीर अपघात झाले असून, त्यामध्ये ८१ नागरिक गंभीर जखमी झाले आहे, शिवाय ४९ किरकोळ अपघात झाले असून त्यामध्ये ९८ नागरिक किरकोळ जखमी झाले आहे.
तर ५९ अपघातांमध्ये कोणत्याही दुखापती झाल्या नसून असे एकूण १४८ अपघात समृध्दी महामार्गावर झाले आहे. त्याप्रमाणेच औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना दोन्ही ठिकाण मिळून ४ जीवघेण्या अपघातामध्ये ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १४ गंभीर अपघातामध्ये २८ नागरिक गंभीर जखमी झाले आहे.
४१ किरकोळ अपघातामध्ये ७३ नागरिक जखमी झाले आहे. तर , विका गुखापतीचे ३९ अपघात होऊन एकूण ९८ अपघात झाले आहे. तर पुणे विभाग मिळून एकूण राज्यभरात ३१ मार्च पर्यंत १७ जीवघेण्या अपघातामध्ये २८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ४२ गंभीर अपघातांमध्ये १०९ गंभीर जखमी झाले आहे.
तर ९३ किरकोळ अपघातामध्ये १७४ नागरिक किरकोळ जखमी झाले आहे. तर १०१ अपघात विना दुखापतीचे झाले असून, राज्यभरात एकूण अपघात २५३ असल्याची माहिती महामार्ग पोलीस विभागाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.