मुंबई: एकीकडे मुंबईत आणि राज्यात सरकार लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहे. तर दुसरीकडे मात्र मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल 44 हजारांच्या पार पोहोचला आहे.
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 1,442 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 44,704 झाली आहे. तर आज 48 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 1465 झाली आहे.
मुंबईत आज 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1465 वर पोचला आहे. आज नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 33 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 33 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 7 जणांचे वय 40 च्या खाली होते. तर 23 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.
हेही वाचा: 'वंदेभारत' अभियानातून चार हजार प्रवासी राज्यात दाखल; जूनअखेर आणखी 38 उड्डाणे
संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 845 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 34065 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 626 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 18,098 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
mumbai 44 thousand mark of corona patients read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.