मुंबई

अदानी वीज ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता असं भरता येणार वीज बिल

पूजा विचारे

मुंबईः अदानी वीज कंपनीच्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरातल्या ग्राहकांना वीज बिल ईएमआयमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसंच बिल ईएमआयमध्ये भरताना  व्याजमुक्त असेल असंही कंपनीनं नमूद केलं आहे. 

ग्राहक आता बिलं तीन हफ्त्यांमध्ये व्याज मुक्त रकमेसह भरु शकतात. देय तारखेपूर्वी ईएमआय पेमेंट करून ग्राहकांना या सुविधाचा फायदा घेता येईल. एमईआरसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्यांची वीजबिलांची सरासरी रकमेपेक्षा दुप्पट रक्कम झाली आहे अशा सर्व ग्राहकांना ईएमआय सुविधा उपलब्ध असल्याची माहिती, AEMLचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल म्हणाले.

सद्य परिस्थिती हाताळण्यासाठी वितरण सुविधांसाठी MERC च्या सक्रिय मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या एमईआरसीने नुकत्याच जाहीर केलेल्या 18 टक्के कर कपातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं त्यांनी म्हटलं. ईएमआय सुविधा घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना उपलब्ध असेल.

AEML ग्राहकांच्या प्रश्न आणि शंकांचं निरसन करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसंच याव्यतिरिक्त बिलिंग सपोर्ट,  बिलिंग प्रक्रियेचे स्पष्टीकरण देणारी सामाजिक जागरूकता व्हिडिओ कॉल आणि  24/7 हेल्पलाइन नंबर या सुविधेचाही समावेश आहे. कंपनी येत्या काही दिवसात मुंबई महानगर प्रदेशात सात लाख स्वयंचलित मीटर देखील स्थापित करणार आहे. 

'बेस्ट'चा मुंबईकरांसाठी एकदम बेस्ट निर्णय

बेस्टनं वीज बिलापोटी आकारलेली अधिकची रक्कम व्याजासह परत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई शहरात वीज पुरवठा करणारी कंपनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (बेस्ट) ने आपल्या ग्राहकांना ३ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा दिली आहे.  

याबाबत बेस्टनं पत्रक काढलं आहे. या पत्रकात स्पष्ट केलं आहे की, १९ मे पासून उपक्रमाच्या औद्योगिक आणि वाणिज्य वीज ग्राहकांना त्यांच्या अंदाजित वापराच्या १० टक्के वापरावर आधारीत वीजदेयक सादर करण्यात आलेली आहेत. औद्यागिक आणि वाणिज्यीक वीज ग्राहकांना स्थिर आकारांवर ३ महिन्यांकरीता अधिस्थगन करण्याची मुभा दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व ग्राहकांना देण्यात आलेली वीज देयके ही मार्च महिन्याच्या विजेच्या वापराच्या आधारे देण्यात आलेली आहेत. सरासरीपेक्षा जास्त बिले आलेल्यांसह ज्यांना बिलाची सर्व रक्कम एकदम भरता येणं शक्य नसेल  त्यांनाही तीन महिने मुदतवाढ दिली आहे.

Mumbai Adani Consumers Electricity Bill Pay Interest Free EMIs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT