Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

अदानी समूह धारावीचे पुनर्वसन, नूतनीकरण, सुविधा व पायाभूत सुविधांचा विकास करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai - महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प औपचारिकपणे अदानी समूहाच्या कंपनीकडे सोपवला आहे. या प्रकल्पांतर्गत, २०,००० कोटी रुपये खर्चून मध्य मुंबईतील २५९ हेक्टर धारावी झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अदानी प्रॉपर्टीजने या योजनेसाठी स्पर्धात्मक बोली जिंकली होती. त्यात डीएलएफ आणि नमन डेव्हलपर्स सहभागी झाले होते. राज्य मंत्रिमंडळाने २२ डिसेंबर २०२२ रोजी बोली प्रक्रियेचा निकाल मंजूर केले होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे कंपनीला मध्य मुंबईतील लाखो चौरस फूट निवासी आणि व्यावसायिक संकुलांची विक्री करून अधिक महसूल मिळवता येईल. महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विकास विभागाने गुरुवारी जारी केलेल्या आदेशाद्वारे अदानी समूहाला हक्क प्रदान केले आहेत.

या प्रकल्पांतर्गत २.५ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात राहणाऱ्या ६.५ लाख झोपडपट्टीधारकांचे सात वर्षांच्या कालावधीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. कंपनी धारावीचे पुनर्वसन, नूतनीकरण, सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास करणार आहे. यासाठी सरकारने विजेत्या बोलीदाराकडून २०,००० कोटी रुपयांची किमान एकत्रित निव्वळ संपत्ती मागितली होती.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अदानी कंपनीला स्पेशल पर्पज व्हेईकल तयार करावे लागणार आहे. यासोबतच सरकारने गुंतवणुकीची पद्धतशीर कालमर्यादाही निश्चित केली आहे.

इमारतींच्या बांधकामादरम्यान सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या सर्व घटकांची काळजी कंपनीला घ्यावी लागणार आहे. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. अदानी समूहाला अगोदर येथे राहणाऱ्या लोकांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये स्थलांतरित करावे लागेल. त्यानंतर या इमारतींचे बांधकाम सुरू होईल.

गतवर्षी झाली होती बोली

अदानी प्रॉपर्टीजने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या योजनेची स्पर्धात्मक बोली जिंकली होती. त्यात डीएलएफ व नमन डेव्हलपर्सही सहभागी झाले होते. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने 22 डिसेंबर 2022 रोजी बोली प्रक्रियेचे निकाल मंजूर केले होते.

अदानी समूहाला हक्क प्रदान

राज्याच्या गृहनिर्माण विकास विभागाने गुरुवारी जारी केलेल्या आदेशाद्वारे अदानी समुहाला या प्रकल्पाशी निगडित हक्क प्रदान करण्यात आले. या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर कंपनीला मध्य मुंबईतील लाखो चौरस फूट निवासी व व्यावसायिक संकुलांची विक्री करून कोट्यवधींचा महसूल मिळवता येईल. या प्रकल्पांतर्गत ६.५ लाख झोपडपट्टीधारकांचे ७ वर्षांच्या कालावधीत पुनर्वसन करण्यात येणार आहे.

पुनर्वसनासह पायाभूत सुविधांचा विकास

अदानी समूह धारावीचे पुनर्वसन, नूतनीकरण, सुविधा व पायाभूत सुविधांचा विकास करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अदानी कंपनीला स्पेशल पर्पज व्हेईकल तयार करावे लागणार आहेत. सरकारने गुंतवणुकीची योग्य ती कालमर्यादाही निश्चित केली आहे. इमारतींचे बांधकाम करताना कंपनीला सुविधा व पायाभूत सुविधांच्या सर्व घटकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

टप्प्याटप्प्याने होणार धारावीचा पुनर्विकास

धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. अदानी समूहाला सर्वप्रथम येथे राहणाऱ्या लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यांत स्थलांतरित करावे लागेल. त्यानंतर या इमारतींचे बांधकाम सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT