Mumbai-Ahmedabad Highway Accident Esakal
मुंबई

Mumbai-Ahmedabad Highway वर सिलिंडर ट्रकचा स्फोट, वाहतूक विस्कळीत; पाहा व्हिडिओ

आशुतोष मसगौंडे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली असून ती विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये सिलिंडरने भरलेला ट्रक उलटलेला दिसत आहे. याचबरोब या मार्गावर 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दरम्यान हा अपघात आज सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई फाट्याजवळ घडला. हा ट्रक हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जात होता.

अपघातानंतर ट्रकला आग लागली होती, पण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. आगीमुळे एक जण जखमी झाला.

सुदैवाची बाब म्हणजे ट्रकला आग लागल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला नाही. पेल्हार पोलिसांनी सांगितले की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकाला धडकल्यानंतर उलटला.

वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी भूपेश भोईर यांनी सांगितले की, ट्रक गुजरातहून मुंबईकडे जात होता, त्यात हायड्रोजन गॅस सिलिंडर भरले होते.

हा ट्रक वसई ते तुंगारेश्वर फाट्यादरम्यान आल्यानंतर नियंत्रणाबाहेर जाऊन अपघात झाला. यावेळी ट्रकने पेट घेतला. ट्रकमध्ये भरलेल्या काही सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.

भूपेश भोईर यांनी पुढे सांगितले की, या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ते म्हणाले की, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असता मोठी आग लागली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel यांचं ठरलं! नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार, भावी खासदार उल्लेख; कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Kangana Ranaut : कंगनाचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी सिनेमाला अखेर मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र ; अभिनेत्री म्हणाली...

Sameer Wankhede: समीर वानखेडे सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढणार? या दोन जागांबाबत शिंदेंशी चर्चा; पक्षानं स्पष्टचं सांगितलं

PAK vs ENG: लढले, अडखळले, पण शेवटी पाकिस्तानने शस्त्र टाकले; इंग्लंडचे खेळाडू चतुराईने खेळले

Guhagar Assembly Elections 2024: भास्कर जाधव- साड्या वाटणारे कोरोना, वादळात होते कुठे ?

SCROLL FOR NEXT