Mumbai Ahmedabad National Highway car accident three killed two injured police hospital  sakal
मुंबई

Car Accident : भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे ते धानिवरी दरम्यान रविवारी एका कारचा भीषण अपघात

महेंद्र पवार

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे ते धानिवरी दरम्यान रविवारी एका कारचा भीषण अपघात झाला आहे. यात राठोड कुटुंबातील आजोबा, मुलगा व नातू अश्या तिन जणांचा मृत्यु झाला आहे.

तर 2 प्रवासी गंभीर तर इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवार 8 जानेवारी रोजी नालासोपारा कडून गुजरात मधील भिलाड येथे जात असताना mh. 02 dn. 6868 या कारचा ११.२५ वाजताच्या सुमारास विवळवेढे ते धानीवरी दरम्यान ओव्हरटेक करताना समोर जाणाऱ्या कंटेनर ला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा भीषण अपघात झाला आहे.

यात कारचा पुढील भागाचा चक्का चुर झाला.या अपघातात नरोत्तम छना राठोड वय - ६० हे जागीच मृत्यु मुखी पडले तर केतन नरोत्तम राठोड - वय ३०आणि एक चिमुकली आरवी दिपेश राठोड वय - १ वर्ष यांचा कासा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .

तर वाहनं चालक दिपेश नरोत्तम राठोड वय - ३२, तेजल दिपेश राठोड - ३०, मधू नरोत्तम राठोड - ६०, स्नेहल दिपेश राठोड - वय २ वर्ष हे जखमी झाले असून त्यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

महामार्ग पोलिस व कासा पोलिस घटना स्थळी पोहचून मदतकार्य करीत आहेत. काही काळ झालेली वाहतूक कोंडी सोडवून क्रेन ने अपघात ग्रस्त वाहने बाजूस घेतली. पुढील कार्यवाही कासा पोलिस करीत आहेत. चालक दिपेश राठोड याने उपचारा दरम्यान पोलिसाना ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT