मुंबई

मुंबईकरांनो सावधान, शहरातल्या हवेत प्रदूषित घटक चारपटीनं जास्त

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईच्या हवेत प्रदूषणाच्या घटकांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या मर्यादेपेक्षा चारपटीने जास्त असल्याचा अहवाल मांडण्यात आला आहे. जगातील 50 प्रदूषित शहरातील 35 शहरे भारतात आहेत. 2020 या वर्षात जगातील 106 शहरांच्या प्रदूषणाची माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार, मुंबईतील पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) 2.5 हे प्रति क्युबिक क्षेत्रावर 41.3 पीएम एवढे आढळून आले. ही नोंद जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा चारपटीने अधिक असल्याचे अहवालात मांडले आहे.

पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) 2.5 च्या प्रमाणावर आधारित हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजणार्‍या स्विस गटाच्या आयक्यूएयरने हा अहवाल मांडला आहे.  गेल्या एका वर्षभरात  शहरातील पीएम 2.5 च्या वार्षिक सरासरीमध्ये सुधारणा झाली होती. 2019 या वर्षी हे प्रमाण 45.3 µg / m3 एवढं होते.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार शहरातील वायू प्रदूषणाला पीएम 2.5 हा प्रमुख घटक असून हा हवेत दीर्घकाळापर्यंत राहिल्यास कॅन्सर आणि ह्रदयाचा त्रास यासारखे प्राणघातक आजार होऊ शकतात. 

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, डिसेंबर 2020 मध्ये पीएम 2.5 ची सर्वाधिक मासिक सरासरी 70.6 µg / m3 एवढी होती. मात्र , हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी या काळात याची उच्च प्रदूषण पातळी नोंदवली गेली. तर मान्सूननंतर म्हणजेच सप्टेंबरमध्ये सर्वात कमी वायू प्रदूषण पातळी नोंदवली गेली आहे. 

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान वाहतूक कमी होती. त्यामुळे जूनमध्ये प्रदुषणाची पीएम 2.5 ची मासिक सरासरी सर्वात कमी म्हणजे  15.9 µg / m3 एवढी नोंदविली गेली.  याच पीएम  2.5 ची पातळी मे महिना ते सप्टेंबर 2020 या कालावधीत सर्वात कमी म्हणजे 25 µg / m3  नोंदवली असल्याचे अहवालात नोंदवले गेले आहे. 

कोविड 19 या साथीच्या आजारामुळे देशव्यापी केलेल्या लॉकडाऊनमुळे पीएम 2.5 घटकाच्या वार्षिक सरासरीत 11% घट झाली असताना बांग्लादेश आणि पाकिस्ताननंतर भारताची जगातील तिसरा प्रदूषित देश म्हणून नोंद झाली. त्यामुळे भारतातील वायू प्रदूषण अजूनही धोकादायक प्रमाणात असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

2020 वर्षात नवी दिल्लीची सरासरी वार्षिक घनमीटर हवा 84.1 होती. हे प्रमाण बीजिंगच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. 2020 मध्ये दक्षिण आशियात जगातील सर्वात खराब हवा होती असे या अहवालात म्हटले आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai air pollution levels are four times higher than World Health Organization limit


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT