मुंबई

भीषण ! मुंबईतील 25 हजार नागरिकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू 

भाग्यश्री भुवड

मुंबई, 20 : वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळतात तेव्हा त्याला आपण वायुप्रदूषण म्हणून संबोधतो. अर्निबंध विकासप्रक्रियेचं जाळे वाढत असल्यामुळे अपरिहार्य कारणांमुळे वायू प्रदूषण  मिळतंय. यामुळे अनेक शहरांची घुसमट होत आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मर्यादेबाहेर गेली आहे.  त्यामुळे, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता  वर्तवण्यात येतेय. भारताने हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दोन वर्षांपूर्वीच दिला होता. 

दोनच दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रीनपीस साऊथइस्ट आशियाच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये मुंबईमध्ये पंचवीस हजार मृत्यूसाठी वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे. 

बोरिवलीच्या अपेक्स रुग्णालय समूहाचे  छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ  डॉ. जिग्नेश पटेल यांनी सांगितले की, भारतामध्ये मुंबई, दिल्ली, लखनौ, बंगलोर, हैद्राबाद आणि चेन्नई ही सहा शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरे असून दिल्ली शहरात 2020 मध्ये 54000 नागरिकांचा मृत्यू झाला असून मुंबईचा दुसरा नंबर आहे. मुंबईच नाही तर मुंबईच्या लगतची शहरे सुद्धा प्रदूषित आहेत. यामध्ये ठाणे , नवी मुंबई, पनवेल पालघर शहरांचा समावेश आहे.

मुंबई शहरात सुरु असलेले मेट्रोची कामे, नवीन बांधकामे, कारखान्यातून होणारे प्रदूषण आणि दुचाकी व चारचाकी वाहनांची झालेली अमर्याद वाढ ही कारणे मुंबई व लगतच्या शहरांमध्ये वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. 

हिवाळ्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढीस लागून अतिसूक्ष्म धूलिकण खाली येतात व या धूलिकणांमध्ये हवेतील धूर व धुके मिसळल्यामुळे स्मॉग तयार होत असल्यामुळे इतर ऋतुच्या तुलनेत हिवाळ्यात वायू प्रदूषणामुळे मृत्युदर वाढतो असा निष्कर्ष आहे. 

जगातील प्रगत शहरांमध्ये हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे उपाय योजना करण्यास सुलभ ठरते. भारतामध्ये सुद्धा अशा यंत्रणेची गरज आहे. वायू प्रदूषणामुळे घशाचे श्वसनाचे विकार, सर्दी, खोकल्यामध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण अपेक्स रुग्णालय समूहाने केले आहे.

कोरोनापेक्षा अधिक मृत्यू प्रदूषणामुळे होत असून 2019 साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल 17 लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सादर केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल लॅन्सेट हेल्थ जर्नलमध्ये ही प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

कल्याणच्या स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे  जेष्ठ जनरल फिजिशियन डॉ प्रदीप शेलार यांनी सांगितले की, "वायू प्रदूषणामुळे निर्माण होणारे कण इतके सूक्ष्म म्हणजे नॅनो असतात की ते शरीरात पेशींमध्ये जाऊन बदल करतात जे लक्षातही येत नाही. यामुळे अनेकदा काहींना कर्करोगांसारख्या विकारांना सामोरं जावं लागतं, अशी गंभीर बाब गेल्या काही वर्षांमध्ये ठळकपणे दिसून आली आहे.

तसंच वायुप्रदूषणामुळे मृत्युदरही वाढल्याचे प्रामुख्याने आढळून आले आहे. वायू प्रदुषण वाढल्याने फुफ्फुसासंबंधी आजारांमध्ये वाढ झाली असून सीओपीडी, लोअर रेस्पिरेटरी इंफेक्शन , फुफ्फूसाचा कर्करोग आणि इतर आजारांमध्ये ह्रदयविकार, स्ट्रोक, मधूमेह, लिओनेटल डिसऑर्डर,ब्रॉन्कायटिस, श्वसनाचे आजार, दम्याचे अ‍ॅटॅक असे आजार  वाढीस लागले आहे. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये म्हणजेच डोंबिवली, कल्याण, तळोजा- बोईसर येथे असलेल्या रासायनिक कारखान्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे.

mumbai is amongst worst cities in india where air pollution is taking death toll 25 thousand lost lives

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT