मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्ष आक्रमक झाले असून मुंबईत भाजप कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन सुरू आहे. मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना प्रविण दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले होते. आता यावरुन आम आदमी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत भाजप कार्यालयासमोर आपचं आंदोलन सुरू आहे. (aap shew aggression against pravin darekar in front of bjp office on mumbai bank scam)
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांनी कामगार असल्याचे सांगून कामगार सहकारी संस्थेकडून 25,000 रुपये मोबदला घेतला, असे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले, होते. यावर आता आप यांनी आक्रमक भूमिका घेत प्रविण दरेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप च्या कार्यलयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रविण दरेकर आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रकरणावर दरेकर यांनी असा दावा केला होता की आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेल्या व्यक्तीला सोसायटीच्या सदस्यत्वातून काढून टाकण्याबाबत कोणतेही नियम नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.