Mumbai  sakal
मुंबई

Mumbai : उल्हासनगरमध्ये भाजप शिंदे गटात बॅनर वॉर, दिवसभराच्या नाट्यानंतर पडला पडदा

कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ एक बॅनर लावला होता.

शर्मिला वाळुंज

Mumbai - ठाणे जिल्ह्यात भाजप शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू असून उल्हासनगर मध्येही याचे लोण पहायला मिळत आहे. उल्हासनगर मध्ये शिंदे गटाने "कमजोर लोग शिकायत करते है" अशा आशयाचे बॅनर लावत भाजपला डिवचले होते.

त्यावर भाजपने "50 कुठं आणि 105 कुठं? हा भाजपचा मोठेपणा" असे बॅनर लावत सेनेच्या वर्मी घाव घातल्याने उल्हासनगर मध्ये शिंदे गट भाजप मध्ये बॅनर वॉर दिसून आला. भाजपचा हा बॅनर रातोरात लागला आणि चोरीला देखील गेला. शिवसेनेने हा बॅनर चोरल्याची एकच चर्चा झाली. यानंतर अखेर मित्रपक्ष पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत वाद मिटवत दिवसभराच्या या नाट्यावर पडदा टाकला.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मित्र पक्षातील वाद उफाळून आला आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप सक्रिय होताच शिंदे गट देखील शक्तिप्रदर्शन करू लागला.

सेनेच्या वर्चस्वामुळे तसेच मानपाडा येथे भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. आणि राजकीय नाट्याला सुरवात झाली. भाजप शिंदे गटातील हा वाद दिवा, कल्याण डोंबिवली नंतर आता उल्हासनगर मध्ये दिसून येत आहे.

कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ एक बॅनर लावला होता. या बॅनरवर 'कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है!' असा मजकूर छापण्यात आला होता.

या बॅनरमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे बुधवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 कुठे आणि 105 कुठे? हा तर आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!' असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले होते. भाजपचा हा बॅनर रातोरात चोरीला देखील गेला.

शिवसेनेनेच हा बॅनर चोरल्याची जोरदार चर्चा होऊ लागली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्हं निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांच्या पुढाकाराने दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली.

आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, भाजपकडून बॅनर लावणारे प्रदीप रामचंदानी, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर, नाना बागुल यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत यापुढे कोणीही एकमेकांविरोधात बॅनरबाजी न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आम्ही दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्रच आहोत, मात्र परिवार म्हटला की छोटी-मोठी भांडणं होतातच. हे वाद आम्ही एकत्र बसून मिटवले असून यापुढे दोन्ही पक्षांकडून कोणतीही बॅनरबाजी होणार नाही, असा विश्वास यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष जमनू पुरस्वानी आणि भाजपा आमदार कुमार ऐलानी यांनी व्यक्त केला.

तर दोन भावांमध्ये भांडणं झाली आणि ती भांडणं रस्त्यापर्यंत पोहोचली. त्यामुळेच आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून हे वाद मिटवले, अशी प्रतिक्रिया भाजपकडून बॅनर लावणारे प्रदीप रामचंदानी यांनी दिली.

तर आमच्यात असे कोणतेच वादच नव्हते, आम्ही एकत्रच आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी दिली. त्यामुळे या सगळ्या वादावर आता पडदा पडला असून भविष्यात पुन्हा अशा कुरबुरी होऊ नयेत यासाठी दोन्ही पक्षांचे नेते काळजी घेणार असल्याचे सांगितले. मित्र पक्षातील या बैठकीमुळे उल्हासनगर मधील राजकीय नाट्यावर सध्या तरी पडदा पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT