MLA Mihir Kotecha Esakal
मुंबई

'बेस्ट'च्या 3600 कोटींचा घोटाळा बाहेर काढणार- आमदार मिहिर कोटेचा

बेस्टच्या 900 ई-बसेसच्या 3600 कोटींच्या कंत्राटात घोटाळा- कोटेचा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबई बेस्टच्या (Mumbai Best) ९०० ई बसेसच्या (E-Buses) ३६०० कोटींच्या कंत्राट घोटाळा प्रकरणी कॅग आणि न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार मिहिर कोटेचा (MLA Mihir Kotecha) यांनी दिली. मुंबईकरांच्या मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क तुमच्या घोटाळ्याने हिरावू देणार नाही असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना देण्यात आला. ९०० ई बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की कॅासेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा प्रश्न ही यावेळी उपस्थित करण्यात आला.

९०० दुमजली बसेस धावू शकतील का?

आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधताना कोटेचा म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी ३६०० कोटीचा निधी मुंबईकरांना दिला. मात्र प्रत्यक्षात निविदा २०० बसेस गाड्यांची निघाली. नंतर ती ४०० झाली. मंजूरी मिळेपर्यंत कुठलीही पुनर्निविदा न काढता तिची संख्या ९०० पर्यंत करण्यात आली. मुंबईच्या रस्त्यावर खरोखर ९०० दुमजली बसेस धावू शकतील का? याचा कधी फिजीबीलीटी रिपोर्ट घेतलाय का असा प्रश्न मिहिर कोटेचा यांनी पर्यावरण मंत्र्यांना विचारला.

मुंबईकरांसमोर आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार असून, २८०० कोटींच्या घोटाळ्याबाबत आम्ही कॅग आणि न्यायालयात दाद मागणार

२८०० कोटींच्या घोटाळ्याबाबत न्यायालयात जाणार

ज्या कंपनीला तुम्ही काॅन्ट्रक्ट दिले आहे त्या कंपनीचं भाग भांडवल फक्त एक लाख रूपये आहे. त्यांना तुम्ही २८०० कोटीचं कंत्राट कोणत्या आधारावर, कोणत्या हेतूसाठी देत आहात? याचे उत्तर आम्हाला द्या. मुंबईकरांसमोर आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार असून, २८०० कोटींच्या घोटाळ्याबाबत आम्ही कॅग आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचे ही ते म्हणाले.

नेमके प्रकरण काय आहे

डिसेंबरमध्ये २०० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रीक बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा बेस्टकडून काढण्यात आली होती. मात्र प्रस्ताव मजुरी करतांना २०० च्या जागी ९०० बसेसचा प्रस्ताव समोर आला. एकंदरीत ३६०० कोटींचे कंत्राट आणि त्यापैकी एका विशिष्ट कंपनीला दिले. कॉसीस ई-मोबिलिटी (Causis E-mobility Pvt. Ltd.) ह्यांच्या खिशात ७०० बसेस घालण्यात आल्या. बसेसची पुनर्निविदा न काढता २८०० कोटींचे कंत्राट देण्याचे कारस्थान सत्ताधारी पक्षाने केलेले आहे असा आरोप कोटेचा यांनी केला. यावेळी नगरसेवक विनोद मिश्रा, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, रेणु हंसराज, बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT