बेस्टच्या वीज वितरण क्षेत्रात १० लाख वीज ग्राहकांचे मीटर येत्या काळात स्मार्ट तंत्रज्ञानावर कार्यरत होतील.
मुंबई - बेस्टच्या वीज वितरण क्षेत्रात १० लाख वीज ग्राहकांचे मीटर येत्या काळात स्मार्ट तंत्रज्ञानावर कार्यरत होतील. बेस्ट उपक्रमाकडून मुंबईतील वीज वितरण क्षेत्रात मीटर बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार मार्चपासून वॉर्डनिहाय या कामाला सुरुवात होईल. मुंबईतील निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक तसेच झोपडपट्टी भागातील ग्राहकांचे मीटर या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बदलण्यात येणार आहेत. बेस्ट आणि अदाणी यांच्यातील करारानुसार १३०० कोटी रुपये या कामासाठी उपक्रमाकडून देण्यात येणार आहेत.
मुंबईत वीज वितरणाची जबाबदारी असणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून अदाणी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार अदाणी कंपनीच्या माध्यमातून तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डात हा मीटर बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत काही ठिकाणी कंट्रोल रूमदेखील तयार करण्यात येतील. स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्मार्ट मीटरचे तंत्रज्ञान वापरात येईल.
स्मार्ट मीटरचे फायदे
स्मार्ट मीटरच्या तंत्रज्ञानाने विजेची वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करणे शक्य होणार आहे. एखाद्या ग्राहकाचा वाढलेला किंवा कमी झालेला विजेचा वापर या तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॕक करणे शक्य होईल. त्यामुळे वीज चोरीमुळे किंवा इतर कारणांमुळे होणारी विजेची गळती कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वीजचोरीच्या प्रकारालाही आळा बसेल. ग्राहकांनाही आपल्या वीज वापराचे ट्रॕकिंग मोबाईल एपच्या माध्यमातून करता येईल. त्यामुळेच विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल.
सुरूवातीला वॉर्डनिहाय रहिवासी सोसायटीच्या तसेच आस्थापनांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बदलण्याचे काम केले जाईल. त्यानंतर झोपडपट्टी भागात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या भागातील जागेची उपलब्धतचा तसेच देखभाल दुरुस्ती यासारखी आव्हाने असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. परंतु वॉर्डात एकाचवेळी अनेक ठिकाणी कामे करणे शक्य होईल, त्यामुळे वर्षभरात १० लाख़ मीटर स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून बदलण्याचे लक्ष्य ठेवल्याचे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.