Bhendi Bazar Sakal
मुंबई

Mumbai News : १० वर्षांपासून भेंडी बाजार संक्रमण शिबिरात कोणतीही तक्रार नाही - अकबर चेशतवाला

भेंडी बाजार पुनर्वसन प्रकल्प हा मुंबईतील सर्वात मोठा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. यात ३ हजार २०० कुटुंब आणि १२५० दुकानांचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

भेंडी बाजार पुनर्वसन प्रकल्प हा मुंबईतील सर्वात मोठा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. यात ३ हजार २०० कुटुंब आणि १२५० दुकानांचा समावेश आहे.

मुंबई - '१० वर्षांपासून आम्ही या संक्रमण शिबिरात राहतो आहे. जुन्या चाळीतील छोटी घरे, पिण्याचा पाण्याचा त्रास यापेक्षा ही संक्रमण शिबिरे अतिशय उत्तम आहेत. कोणताही प्रकल्प उभा राहण्यासाठी वेळ हा लागतोच मात्र नागरिक संक्रमण शिबिरात होणाऱ्या त्रासाला कंटाळतात. पण आम्हाला इथे कोणताही त्रास नाही', अशी प्रतिक्रिया भेंडी बाजार चाळ पुनर्वसन प्रकल्पग्रस्त आणि संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या अकबर चेशतवाला यांनी दिली.

भेंडी बाजार पुनर्वसन प्रकल्प हा मुंबईतील सर्वात मोठा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. यात ३ हजार २०० कुटुंब आणि १२५० दुकानांचा समावेश आहे. सात वर्षांपूर्वी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. प्रकल्पासाठी एकूण साडेसोळा एकर क्षेत्र रिकामे करण्यात आले. यावेळी नागरिकांचे ३ संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले. यापैकी २ संक्रमण शिबिरे म्हाडाच्या इमारती तर १ शिबीर हे ट्रस्टच्या जागेत उभारलेल्या इमारती आहेत. त्यापैकी म्हाडाचे एक संक्रमण शिबीर खाली करण्यात आले आहे.

सद्यस्थितीमध्ये घोडपदेव येथील म्हाडा इमारतीत हे नागरिक वास्तव्यास आहेत. साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांचे याठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. त्यापैकी फेज १ मधील बांधकाम पूर्ण झाल्याने ६२४ हुन अधिक नागरिकांना आपल्या घरांचा ताबा मिळाला आहे. तर उर्वरित नागरिक अदयाप संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत. फेज २ मध्ये ४ इमारतींमध्ये २५५०हुन अधिक नागरिकांना घरांचा तर ६५० हुन अधिक दुकानदानांना ताबा देण्यात येईल, अशी माहिती एसबीयुटीने दिली.

मधल्या काळात प्रकल्पाचा वेग मंदावल्याने १० वर्षांपासून अनेक नागरिक या संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत. मात्र या संक्रमण शिबिरात नागरिकांना मिळत असलेल्या सुविधांमुळे इतकी वर्षे संक्रमण शिबिरात राहूनही नागरिकांची कोणतीही तक्रार नसल्याचे या शिबिरात राहणारे प्रकल्पग्रस्त नागरिक सांगतात. माजी नगरसेवक आणि प्रकल्पग्रस्त इस्माईल अहमद अली नळवाला म्हणतात,'माझा जन्म भेंडीबाजारमध्येच झाला. माझं वय आता ७२ वर्षे आहे. आमची जागा एसबीयुटी डेव्हलप करते आहे. आम्ही पूर्वीही एकत्रित राहत होतो आता इथेही मिळून मिसळून राहतो. इथे कोणतंही त्रास नाही. १६०० रुपयांपर्यंचे विजेचे बिल विकासक भरतात', अशी माहितीही त्यांनी दिली.

व्यावसायिक संक्रमण शिबिरे

भेंडी बाजारमध्ये व्यवसाय करणारे व्यावसायिकांनी मागणी केल्यानुसार त्यांच्यासाठी त्याच परिसरात प्रकल्पानांतर्गत उभारण्यात आलेल्या सेक्टर २ मध्ये व्यवसाय संक्रमण शिबिरे उभारण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना त्याच्या व्यापारात कोणतेही नुकसान झाले नाही. तर त्यांना व्यवसाय वृद्धीसाठीही त्यातून मदत झाल्याची माहिती सैफी बुरहाणी ट्रस्टने दिली.

संक्रमण शिबिरात पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

- पूर्णतः फर्निश खोली

- खोलीत एक कपाट कारपेट, खिडक्यांचे पडदे, उश्या

- वॉशिंग मशीन

- मूव्हर अँड पॅकर सुविधा

- ३ दिवस कम्युनिटी किचनमधून मोफत जेवण

- १६०० रुपयांपर्यंत वीजबिल मोफत

- पाणीपट्टी किंवा इतर मेंटेनन्स नाही

- पार्किंगची सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Nashik Traffic Route: मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Google Crome Sell : क्रोम ब्राऊजर विकून टाका! US मधून गुगलच्या मालकांना आला फोन, नेमकं प्रकरण काय?

Eye Care Tips : दुषित हवेचा डोळ्यांवर होतोय थेट परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार, उमेदवारांच्या दुचाकी फेरीमुळे मार्ग खोळंबले

SCROLL FOR NEXT