Mumbai Big B Jalsa bungalow sakal
मुंबई

मुंबई : बिग बींच्या 'जलसा' वरही ताडपत्रीचा लाखमोलाचा मंडप

मॉन्सून कालावधीसाठीचा मंडपाचा आकडा लाखांमध्ये

किरण कारंडे

मुंबई : मुंबई महानगरपालिकेपासून ते रेल्वे अशा सगळ्याच यंत्रणांनी येणाऱ्या मॉन्सूनची जोरदार तयारी केल्याचा दावा केला आहे. पण मॉन्सूनपूर्व तयारी ही जुहू तारा रोडवरील सेलिब्रिटींनाही चुकलेली नाही. गळक्या छताच्या समस्येतून बचावासाठी सर्वसाधारण मुंबईकरांसारखीच तयारी ही या भागातील सेलिब्रिटींनीही केली आहे. अशीच मॉन्सूनची तयारी बॉलिवुडचे महानायक बिग बींनाही चुकलेली नाही. आपल्या जलसा आणि जनक या बंगल्याला संपूर्ण ताडपत्रीचे छतच तयार केले आहे. महत्वाचे म्हणजे धर्मेंद यांच्याही बंगल्याच्या ठिकाणी अशीच छताची तयारी झाली आहे. बॉलिवुडमधील जय विरूच्या जोडीच्या बंगल्याच्या ठिकाणी छताचे कंत्राटही एकाच व्यक्तीने घेऊन हे काम पूर्ण केले आहे.

जुहू तारा रोडवर बिग बी अमिताभ बच्चन यांचा जलसा हा १० हजार चौरस फुटांचा असा महाकाय बंगला आहे. मॉन्सून मुंबईत दाखल होण्याच्या आधीच संपूर्ण जलसा आणि जनक या दोन्ही बंगल्यांना ताडपत्रीने झाकले गेले आहे. जवळपास दोन हजार बांबुंचा वापर करत हा बंगला आच्छादित करण्यात आला आहे. याठिकाणी बच्चन कुटुंबाचे वास्तव्य आहे. पारदर्शक अशा ताडपत्रीचा वापर याठिकाणी संपूर्ण बंगल्याला आवरण करण्यासाठी झालेला आहे. जनक बंगलाही जवळपास ८ हजार चौरस फुटाचा आहे. जनक बंगल्यात ऑफिस, जिमनॅशियम तसेच रेकॉर्डिंगची जागा आहे. जलसा बंगल्या पाठी असणाऱ्या जनक बंगल्यालाही संपूर्ण छत घालण्यात आले आहे.

साधारणपणे जून महिन्यापासून येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा छताचा मंडप जलसा आणि जनक दोन्ही बंगल्यांसाठी असणार आहे. तर बॉलिवुड अभिनेता धर्मेंद यांच्या बंगल्याच्या ठिकाणीही त्याच कंत्राटदाराने काम केले आहे. मराळे मरोळीतील एका कंत्राटदाराने हे संपूर्ण काम केले आहे. जलसा बंगल्यासाठी चार ते पाच महिन्यांसाठी साधारणपणे ५ लाख रूपये भाडे आकारल्याची माहिती आहे. जवळपास दहा हजार चौरस फुटाची जागा या एका कामासाठी छताने झाकलेली आहे.

अनेक ठिकाणी बंगल्याच्या छतामधून होणारी गळती टाळण्यासाठी तसेच भीतींमधून येणाऱ्या पाण्यातून बंगल्याचे नुकसान टाळण्यासाठी ही शक्कल कंत्राटदाराने लढवली आहे. मुंबईत पावसाळा सुरू झाला की गळक्या छताची समस्या संपूर्ण शहरभरच जाणवते. त्यामध्ये बच्चन कुटुंबही अपवाद नाही. याठिकाणी छताच्या कामासोबतच सिलिंगचे काम तसेच रंगरंगोटीही करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जवळपास चार ते पाच महिने हा मंडप राहणार असल्यानेच याठिकाणी पाच लाखांपर्यंतचे हे कामाचे कंत्राट दिल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT