Mangal prabhat lodha sakal media
मुंबई

मंगलप्रभात लोढा यांचे सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र, म्हणाले...

कृष्ण जोशी

मुंबई : प्रभादेवी मंदिरासमोर (prabhadevi temple) एका अन्यधर्मीय प्रार्थनास्थळाचा (Worship place) उल्लेख असलेला मैलाचा दगड काढून टाकण्यात आला असला तरी त्यावरून मुंबई भाजप (Mumbai bjp) अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat lodha) यांनी आज सत्ताधारी शिवसेनेवर (shivsena) तोफ डागली आहे. त्यामुळे हा मैलाचा दगड हलवला नसता तर हे प्रकरण चांगलेच तापले असते अशीही चर्चा आज सुरु होती. (Mumbai bjp president mangal prabhat lodha criticizes shivsena on prabhadevi temple issue)

मुंबईत मंदिरांचे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न करू नये, हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तब्बल 300 वर्षे जुने असलेल्या प्रभादेवी मंदिराच्या परिसरात एका अन्यधर्मीय प्रार्थनास्थळाचा उल्लेख असलेला मैलाचा दगड ठेवण्यात आला होता. त्याबाबत बोलताना, हे चुकीचे आहे, हे प्रभादेवी मंदिर आहे, मंदिरच राहणार, मुंबईत हे खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत लोढा यांनी शिवसेनेला फटकारले. या छोट्या मैलाच्या दगडावरून सुरु असलेले हे राजकारण पुढील राजकीय डावपेचांची चुणूकच दाखवीत आहे, अशीही चर्चा परिसरात आहे.

हेमांगी वरळीकर यांनी या मैलाच्या दगडाचं अनावरणही केले होते. मात्र तीनशे वर्षे जुन्या मंदिरासमोर हे सर्व कशासाठी करण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित करत लोढा पुढे म्हणाले की, त्याचमुळे या परिसरातील सूज्ञ नागरिकांनी त्यास विरोध केला. एखादी गोष्ट चुकीची असल्यास त्या विरोधात बोलणे गुन्हा होत नाही. मात्र पोलिसांनी अत्यंत उत्साहाने त्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली, ही बाब चुकीची आहे. बहुदा वरिष्ठांना किंवा राजकीय वरिष्ठांना खूश करण्याचा तो प्रयत्न असावा. आता हा स्तंभ हटवण्यात आला आहे. मात्र पुन्हा असे घडले तर मुंबई भाजपा हे खपवून घेणार नाही, असा इशारा मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे.

शहरातील काही भागांचे थेट धर्मांतरण झाले असून काही भागांत ही प्रक्रिया सुरू आहे. प्रभादेवी मंदिरासमोर जो प्रकार घडला तो हळूहळू धर्मांतराच्या दिशेने जाणारा आहे. मात्र या भागातील स्थानिक नागरिक, भाजपा चे कार्यकर्ते जागरूक होते म्हणून ही बाब वेळीच समोर आली. बाजूलाच एक नवीन इमारत झाली असून इमारतीच्या परिसरात एक स्मृतीस्तंभ होता. मुंबई शहरात अनेक भागांत स्मृतीस्तंभ आहेत, परंतु त्यावरकुठेही प्रार्थनास्थळाच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे प्रभादेवी मंदिरासमोरही असा स्तंभ उभारण्याची काहीच गरज नव्हती. हा तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे का, तसेच यात काय राजकारण दडले आहे, असे प्रश्नही लोढा यांनी याबाबत उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT