मुंबई

मुंबई: कोविड सेंटरमध्ये वर्षभरात 'इतक्या' रुग्णांवर उपचार

मुंबई पालिकेच्या वतीने शहरात कार्यरत आहेत ६ जंबो सेंटर्स

सकाळ वृत्तसेवा
  • मुंबई पालिकेच्या वतीने शहरात कार्यरत आहेत ६ जंबो सेंटर्स

मुंबई: कोरोनाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai BMC) सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत आहे. २०२० मध्ये कोविडच्या (Covid 19) सुरुवातीच्या काळात कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयात 'बेड' मिळण्यात अडचणी येत असल्याने रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. मात्र, अत्यंत कमी कालावधीत नवीन रुग्णालय बांधून रुग्ण बेडची संख्या वाढविणे अशक्‍य होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने उपलब्ध असलेल्या जागांचा उपयोग करून तात्पुरत्या स्वरूपातील 'जंबो कोविड रुग्णालय' (Jumbo Covid Centers) उभारण्याचा निर्णय घेतला. यानुसार वरळी (Worli), बीकेसी (BKC), गोरेगाव (Goregaon), भायखळा (Byculla), मुलुंड (Mulund) आणि दहिसर (Dahisar) या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली. या एकूण ८ हजार ९१५ बेड्सच्या ६ रुग्णालयांमध्ये आतापर्यंत तब्बल ८९ हजार २०६ रुग्णांवर (Successfully treated Patients) वैद्यकीय उपचार करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यासाठी, १ हजार १५७ डॉक्टर्स, १ हजार १३७ परिचारिका, १ हजार १८० वॉर्डबॉय यांच्यासह साधारणपणे ४ हजार ६५८ इतके मनुष्यबळ कार्यरत असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Mumbai BMC 6 Jumbo Covid Centers successfully treated over 89 thousand patients in one year)

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली जम्बो कोविड रुग्णालयांचे नियोजन व व्यवस्थापन करण्यात येते. मुंबईतील विविध ६ ठिकाणी कार्यरत असलेल्या ६ 'जम्बो कोविड रुग्णालयांची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया..

वरळी- हे मुंबईतील पहिले 'जम्बो कोविड‌ रुग्णालय' असून २१ एप्रिल २०२० ला सुरू करण्यात आले. या रूग्णालयात ५९७ बेड्स असून आतापर्यंत ९ हजार ८१ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयात कोविड होऊन गेलेल्या रुग्णांसाठी 'रिहॅबिलिटेशन केंद्र'देखील कार्यरत आहे.

बीकेसी- हे सेंटर १८ मे २०२० पासून मुंबईकरांच्या सेवेत आहे. २ हजार ३२८ बेडच्या रुग्णालयात आतापर्यंत २४ हजार १४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयात एक ग्रंथालयदेखील आहे.

गोरेगाव- गोरेगाव परिसरातील नेस्को कोविड सेंटर २ जून २०२० पासून सुरू आहे. २ हजार २२१ खाटांच्या या रुग्णालयात वर्षभरात २१ हजार ६३७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार झाले आहेत. या रुग्णालयात लसीकरण केंद्रदेखील कार्यरत असून आजवर २ लाख ११ हजार १६५ लशीचे डोस देण्यात आले आहेत.

भायखळा- रिचर्डसन आणि क्रूडास या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनीच्या आवारात हे सेंटर १ जुलै २०२० पासून सुरू आहे. १ हजार बेड्सच्या या रुग्णालयात वर्षभरात ११ हजार २६१ रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

मुलुंड- हे जम्बो कोविड रुग्णालय १६ जुलै २०२० पासून सुरू आहे. १ हजार ७०८ खाटांच्या या रुग्णालयात गेल्या वर्षभरात १२ हजार ९२७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार झाले आहेत. या रुग्णालयात लसीकरण केंद्रदेखील असून येथे आजवर ६३ हजार ८२८ लशीचे डोस देण्यात आले आहेत. या रुग्णालयात ३०० 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स'ही उपलब्ध आहेत.

दहिसर- हे सेंटर २७ जुलै २०२० पासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. १ हजार ६१ बेड्सच्या या रुग्णालयात आतापर्यंत १० हजार १५१ रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयात लसीकरण केंद्रदेखील असून आजवर १ लाख‌ ४५ हजार ८१५ लशीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच, कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी या ठिकाणी दूरध्वनी आधारित 'पोस्ट कोविड' मार्गदर्शन केंद्रही कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT