मुंबई: मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डने (g north ward) आपल्या प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांना पैसे भरुन लसीकरण मोहिम सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. सोसायटीच्या आवारात लसीकरण कार्यक्रम घेण्याचा सल्ला दिला आहे. जी नॉर्थ वॉर्डकडून गृहनिर्माण सोसायट्यांना (housing societies) पत्रच पाठवण्यात आले आहे. मुंबईत काही सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे लसीकरण (vaccination) सुरु आहे. सोसयटीतच लसीकरण मोहिम राबविण्यासाठी हॉस्पिटल्स बरोबर करार घडवून देण्याचेही आश्वासन दिले आहे. (Mumbai BMC asks Dadar Mahim housing societies to opt for paid vaccination)
जी नॉर्थ वॉर्डमध्ये एका बाजूला बहुमजली टॉवर आहेत तर दुसऱ्या बाजूला चाळी, इमारती सुद्धा आहेत. दादर, माहिम, धारावी हा भाग जी नॉर्थ वॉर्डमध्ये येतो. जर एखाद्या सोसायटीने लसीकरण मोहिमेसाठी अर्ज केला, तर खासगी हॉस्पिटल्सकडून सोसायटी सदस्यांसाठी लसीकरण शिबीर आयोजित केले जाईल. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु केलेल्या वॉर्ड वॉर रुम्स या बद्दल अधिक स्पष्टतेने माहिती देऊ शकतात, असे पत्रात म्हटले आहे.
"सोसायट्यांमध्ये कशा प्रकारे लसीकरण मोहिम राबवता येईल, यासाठी हॉस्पिटल्स बरोबर बैठक केली आहे. तीन हॉस्पिटल्सनी सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण करण्यात रुची दाखवली आहे. नवीन लसींचा साठा आल्यानतंर जूनच्या अखेरीस अशा प्रकारे शिबीर आयोजित करण्यात येतील. सध्याचा साठा ज्यांनी नोंदणी केलीय, त्यांच्यासाठी वापरण्यात येईल" अशी माहिती सहाय्यक माहपालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
सध्या मुंबईत काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अशा प्रकारची लसीकरण मोहिम सुरु आहे. तिथे प्रति डोस १ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आकारण्यात येत आहे. अशा शिबीरांसाठी पैसे भरण्याची तयारी रहिवाशांनी दाखवली आह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.