Mumbai news esakal
मुंबई

Mumbai : गुजरातला जाणाऱ्या बोटीसाठी डोंबिवलीतील हटवल्या कमानी

भर रस्त्यावर आलेली बोट गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : उत्सवांच्या काळात लागलेल्या शहरातील कमानी अद्याप हटलेल्या नाहीत. या कमानींमुळे वाहतूक कोंडी होऊन देखील शासनाला जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच डोंबिवलीतून गुजरातला जाणारी एक बोट शहरात गेले दोन दिवस भरकटली असून या बोटीला मार्ग काढून देण्यासाठी का होईना काही कमानी या पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आल्या आहेत. बोटीसाठी काही कमानी काढल्या मात्र वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या इतर कमानींवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातून गुजरातला बोट ट्रान्सपोर्ट करणारा एक कंटेनर रविवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील गावदेवी मंदिर येथील रस्त्यावर भरकटला. शिळफाटा मार्गे जाण्यासाठी वाहनचालकाने जीपीएस वर गुगल मॅप लावला, परंतू अरुंद असा रस्ता त्यावर दाखविला गेल्याने हा मोठा मालवाहू कंटेनर त्या रस्त्यावर अडकला. भली मोठी बोट शहरातील रस्त्यावर आल्याने गेले दोन दिवस डोंबिवलीकरांसाठी हा एक चर्चेचा विषय ठरला होता. याप्रकरणी वाहनचालकावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे म्हणाले, एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, जी अवजड वाहनांची वाहतूक करते. या कंपनीचा एनएल 01 1889 हा कंटेनर जो डोंबिवली पश्चिमेतून 8 तारखेला रात्री मच्छीमारांची जी बोट असते ती बोट रेतीबंदर येथून गुजरात ला नेण्यासाठी घेऊन जात होता. कंपनीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर रविवारी पहाटे तो ती बोट घेऊन शीळफाटा मार्गे गुजरातला जाणार होता. हा चालक नविन असल्याने त्याने जीपीएस प्रणालीवर गुगल मॅप लावला.

त्यात डोंबिवली कोपर उड्डाणपूलावरुन तो चाररस्ता येथे सरळ जाण्याऐवजी डावीकडे वळला आणि पुढे रस्ता अरुंद असल्याने तसेच झाडांच्या फांद्या लागल्याने तो रस्त्यावर अडकला. वाहतूकीला या कंटेनरचा अडथळा निर्माण झाला. वाहतूकीला अडथळा निर्माण झाल्याने रस्ताच्या एका बाजूला हा कंटेनर उभा करुन वाहन चालकावर कलम 283 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील सर्व कागदपत्रांची पाहणी केली असता ती अद्यावत आढळून आली आहेत. केवळ वाहतूक करताना जी काळजी घ्यायला हवी ती न घेतल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. तसेच वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील त्याच्यावर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बोटीसाठी हटविल्या कमानी

ही बोट चार रस्त्यावरुन टिळक चौकातून घरडा सर्कल मार्गे शीळ फाटा रोडवर नेण्याचे वाहतूक पोलिसांनी निश्चित केल्यानंतर मंगळवारी पहाटे वाहनांची वर्दळ कमी असताना बोट हलविण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतू टिळक रोड ते घरडा सर्कल या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानी या बोटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करत असल्याने या कमानी हटविण्याची सूचना वाहतूक पोलिस व टिळकनगर पोलिसांनी पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार रात्रीच्या वेळेत बोटीच्या मार्गातील कमानी पालिका प्रशासनाने हटविल्याचे दिसून आले. परंतू इतर कमानी तशाच असल्याने आता हा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT