मुंबई- मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांना एका अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता. आरोपीने आपण आमदार यशवंत माने असून मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली होती.
त्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपासगुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभाग म्हणजेच सीआययूकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी सीआययू अधिक तपास करत आहेत.
12 फेब्रूवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास प्रवीण पडवळ यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला. तसेच, "तो आमदार यशवंत माने बोलत असल्याचे सांगून मीरा भाईंदर येथे बॉम्ब स्फोट होणार असून तात्काळ पोलीस पाठवा" असे म्हटले होते.
यासंदर्भात अधिक विचारणा करताच, त्याने माहिती न देता शिवीगाळ केली होती. तसेच याबाबत सतत कॉल सुरु होते.पडवळ यांनी तात्काळ याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष आणि मीरा भाईंदर येथील नियंत्रण कक्षास माहिती दिली. तसेच, याबाबत गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातूनही त्याला कॉल केले. मात्र त्याच फोन सतत व्यस्त येत होता. या कॉलनंतर मीरा भाईंदर येथील महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
आमदार यशवंत माने यांचा मोबाईल क्रमांकावरून आल्याचे भासवण्यात आले होते. त्यासाठी आरोपीने तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचा संशय आहे. दूरध्वनीनंतर पडवळ यांनी ही माहिती दोन्ही आयुक्तालयांच्या नियंत्रण कक्षाला कळवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.