मुंबई

मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयाला यूएसए JCI द्वारे सलग दुसऱ्यांदा मान्यता

भाग्यश्री भुवड

मुंबई: 2014 मध्ये अमेरिकेतील संयुक्त कमिशन इंटरनॅशनल(जेसीआय)नं मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयाला मान्यता दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा पुन्हा मान्यता मिळणारे वोक्हार्ट रूग्णालय मुंबईतील पहिले रूग्णालय ठरले आहे. यूएसए जॉइंट कमिशन इंटरनॅशनल(जेसीआय) ही संस्था जगभरातील रूग्णालयातील गुणवत्ता ठरवण्याचं काम करते. वोक्हार्ट रूग्णालयानं रूग्णांना दर्जेदार सोयी-सुविधा पुरवल्यानं पुन्हा या रूग्णालयाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील केंद्र प्रमुख डॉ. पराग रिंदानी म्हणाले की, मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयाला अमेरिकेतील जेसीआयची पुन्हा मान्यता मिळाली, हा आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. या रूग्णालयात आम्ही रूग्णांच्या हिताच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेत आहोत. याशिवाय उत्तम प्रतीचे वैद्यकीय उपचार, डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टार्फ यांना वारंवार आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिलं जात आहे. या सर्व बाबींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय उत्तम दर्जाचे उपकरणं वापरतोय का हे सुद्धा सर्वेक्षणात पाहण्यात आले आहे. त्यानंतर जेसीआयनं रूग्णालयाला दुसऱ्यांदा मान्यता दिली. यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. या रूग्णालयातील प्रत्येक विभागातील डॉक्टर 10,000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. जेसीआयद्वारे मान्यता देण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार केला जातो. या सर्वेक्षणात दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवत असल्याने रूग्णालयाला दुसऱ्या वेळी मान्यता मिळाली आहे.

डॉ. रिंदानी पुढे म्हणाले, कोविड-19 च्या कालावधीत रूग्णालयाने कोरोनाबाधित रूग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. याशिवाय नॉन-कोविड रूग्णांसाठीही सुद्धा स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य रूग्णांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश होता. या रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व रूग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हा उद्देश आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Central Wockhardt Hospital Recognized by USA Joint Commission International Second Time

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT