Blood Pressure sakal
मुंबई

Mumbai News : आरोग्याची काळजी घेण्यात मुंबईकर मागे; उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईच्या व्यग्र जीवनशैलीमुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही. त्यामुळेच मुंबईकर वाढत्या रक्तदाबाला बळी पडत आहेत. एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसीज) कॉर्नरमध्ये आढळून येत असलेल्या नवीन रक्तदाबाच्या रुग्णांची संख्येचा अंदाज रुग्णालयांमध्ये सुरू झालेल्या तपासणीवरून लावता येतो.

गेल्या २२ महिन्यांत एनसीडी कॉर्नर स्क्रीनिंगमध्ये १० टक्के उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत, तर वर्षभरात एक टक्का उच्च रक्तदाबाचे रुग्ण घरोघरी तपासणीत आढळले. जागतिक आरोग्य संघटना आणि महापालिकेने गेल्या वर्षी केलेल्या स्टेप सर्व्हेमध्ये ३४ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे आढळले.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, महापालिका आरोग्य विभागाने ऑगस्ट २०२२मध्ये २६ रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी असंसर्गजन्य रोग (एनसीडी कॉर्नर) सुरू केले. तसेच ३० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने ४ जानेवारी २०२३ पासून घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली. गेल्या २२ महिन्यांत एनसीडीच्या २६ केंद्रांमध्ये ३५ हजार लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त असल्याचे आढळले. तसेच घरोघरी ३० वर्षांवरील १८ लाख लोकांची तपासणी करण्यात आली, त्यात १८ हजार रुग्ण आढळून आले.

आतापर्यंत २१ हजार रुग्णांचे समुपदेशन

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, आतापर्यंत २१ हजारांहून अधिक रक्तदाब रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित समुपदेशन करण्यात आले आहे. त्या म्हणाल्या की, प्रत्येक वॉर्डात महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या योग केंद्राचाही हे रुग्ण लाभ घेत आहेत.

ही कारणे आहेत

  • अयोग्य जीवनशैली

  • धूम्रपान, मद्यपान

  • खूप ताण असणे

  • तळलेले उच्च कॅलरी अन्न/पेयांचे सेवन

  • पाणी कमी पिणे

  • आनुवंशिक कारणे

  • निद्रानाश

ही खबरदारी घ्या

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घ्या

  • जंक फूडपासून दूर राहा

  • नियमित व्यायाम करा

  • ६ ते ७ तास पुरेशी झोप घ्या

  • मीठ कमी प्रमाणात सेवन करा

डॉक्टर काय म्हणतात?

सायन रुग्णालयाचे कार्डियाक सर्जन डॉ. प्रशांत मिश्रा म्हणाले की, उच्च रक्तदाब हा धोकादायक आजार आहे. वास्तविक ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब लक्षणीय वाढतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mains 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; महेश घाटुळे परीक्षेत पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल

2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

'गुड टच अँड बॅड टच' ची कार्यशाळा सुरू होती, तरुणीनं असं काही सांगितलं की पोलिसांना बोलवावं लागलं, काय घडलं?

Kalyaninagar Accident प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जितिया सणादरम्यान मोठी दुर्घटना! 43 जणांचा बुडून मृत्यू, घटनेत 37 मुलांचा समावेश, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT