जेटी  sakal
मुंबई

Mumbai News : जीव मुठीत घेऊन प्रवास; मेरिटाईमचे दुर्लक्ष,दिघी जेटी धोकादायक!

अनेक वर्षांपासून दोन तालुक्यांमधील नागरिक हा प्रवास करतात. मात्र दिघी जेटीच्या देखभाल-दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष झाल्‍याने दररोज हजारो नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

सकाळ वृत्तसेवा

श्रीवर्धन- मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये दळणवळणासाठी जलसेवा सर्वात सोयीचा पर्याय आहे. अनेक वर्षांपासून दोन तालुक्यांमधील नागरिक हा प्रवास करतात. मात्र दिघी जेटीच्या देखभाल-दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष झाल्‍याने दररोज हजारो नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना नादुरुस्त जेटीबाबत वस्तुस्थिती माहीत नसल्याने सेल्फिच्या नादात अपघात होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

दोन वर्षांपूर्वीच मेरीटाईम बोर्डाने जेटीच्या नूतनीकरणाचे काम केले. याच जेटीवरून दिघी-आगरदंडा बंदरात जाणाऱ्या खलाशांचीही चढउतार होते. बंदरातील मोठ्या बोटींवर गरजेची रसद दिघी जेटीवरून केली जाते. जेटीवरील रहदारी पाच वर्षांत चारपट अधिक वाढली आहे. मात्र तुलनेत सोयी-सुविधा उपलब्‍ध झालेल्‍या नाहीत.

प्रवासी जेटीवरून जंजिरा किल्ल्यावर जाता येत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येतात. होडीची वाट पाहाताना तर काही हौशींना सेल्‍फीची मोह होत असल्‍याने ते जेटीवर थांबतात. थर्टीफर्स्टसाठी शैक्षणिक सहलीसाठी आलेली एक विद्यार्थिनी सेल्फीच्या नादात पाण्यात पडता पडता थोडक्यात वाचली. अशा घटना वाढत असल्याने कठड्यांची दुरवस्‍था अपघाताला आमंत्रण देत आहे.जेटी देखभाल-दुरुस्‍तीअभावी कमकुवत झाली आहे.

चारचाकी गाड्या रो-रोमध्ये चढवण्यासाठी केलेला काँक्रिटरस्‍तावरील सळयाही उघड्या पडल्या आहेत. गाड्या वेगाने गेल्‍या की कठडा हालतो. विशेष म्‍हणजे कठड्याचे बांधकाम जेटीवर विशिष्ट लांबीपर्यंत होणे अपेक्षित होते मात्र तसे न केल्‍याने अपघातांचा धोका वाढला आहे.सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याची मागणी श्रीवर्धन तालुक्यात महिनाभरापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. विविध पर्यटनस्थळे तसेच मुरूड-जंजिरा किल्‍ल्यावर पर्यटक मोठ्या संख्येने जातात.

वाहने रोरोमध्ये चढवताना चालकाचे नियंत्रण सुटले तरी अपघाताची शक्यता आहे. सुरक्षेचा विचार करून जेटीवर कठड्यांची दुरुस्‍ती करावी, तसेच रेलिंग बसवण्यात यावे. अशी मागणी स्‍थानिकांकडून करण्यात येत आहे.

दिघी जेटीचे दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे. त्यात कठडा दुरुस्ती व रेलिंगच्या कामाचा समावेश आहे. भविष्यातील वाढती रहदारी लक्षात घेऊन जेटीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. आराखडा पूर्ण झाला असून निधी उपलब्‍ध होताच त्वरित काम सुरू केले जाईल.

- कॅ. सी.जे. लेपांडे, मेरिटाईम बंदर विभाग, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT