Mumbai Rain sakal
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाने रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका; आजही ऑरेंज अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शहर आणि उपनगराला पावसाने आज झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूकीची ठिकठिकाणी कोंडी झाली होती. पावसामुळे रेल्वेचा वेगही मंदावला. लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशीराने होत्या.

मरीनलाईन्सच्या रेल्वे ट्रकमध्ये पाणी भरले होते. समुद्र किना-यावर प्रतिबंध करण्यात आला होता. रेड अलर्ट हवामान खात्याने दिल्यामुळे रेल्वे स्थानकात आज रोजच्या सारखी गर्दी नव्हती. उद्याही पावसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केल्यानंतर मुंबईकरांनी खबरदारीची भूमिका घेतली. शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली होती. अनेकांनी घराबाहेर न पडण्य़ाचा निर्णय घेतला. तर काहींनी घरून काम करण्याची परवानगी घेतली.

त्यामुळे रेल्वे स्थानकांवर रोज सारखी मोठी गर्दी दिसली नाही. दिवसभर पावसाने संततधार सुरुच ठेवल्याने रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली होती. पावसामुळे खड्डेमय रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून सूर्य दर्शन झालेले नाही. हा आठवडाही पावसाचा जाणार असण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जाहिर करण्यात आला होता.

अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याने मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. मुंबईत पाणी साचणा-या ११० ठिकाणी पालिका लक्ष ठेऊन होते. पाणी साचणा-या ठिकाणी पंप लावण्यात आले होते. आज सलग दुस-या दिवशीही सखल भागात पाणी साचले.

कुर्ला, मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, माटुंगा, भांडुप, अंधेरी सबवे, अंधेरी सबवे, मालाड, कुलाबा, मरीन लाईन्स, चर्चगेट आदी सखल भागात पाणी साचले. चर्चगेट येथे रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचले होते.

पालिकेने येथे पंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करून पाण्याचा निचरा केला. गोराई येथे रस्त्यावर मोठे झाड पडल्याने पादचा-यांची गैरसोय झाली. पूर्वद्रूतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांची रखडपट्टी झाली.

पावसाचा रेड अलर्ट असल्याने सायंकाळी पावसाचा आणखी जोर वाढू शकतो. त्यामुळे अडकून पडू नये यासाठी चाकरमान्यांनी घर गाठण्याठी घाई केली. दरम्यान शुक्रवारीही पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहिर केला आहे.

येथे पाणी साचले -

कुर्ला, मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, माटुंगा हायवे, भांडुप, भायखळा डॉकयार्ड, ट्रॉम्बे फ्री वे म्हैसूर कॉलनी, आझाद मैदान, पोयसर सबवे, काळबादेवी एम. के. रोड, विरा देसाई रोड ओशिवरा, घनशॉम टॉवर, पश्चिम द्रूतगती मार्ग, मागाठाणे दहिसर, अंधेरी सबवे, घाटकोपर, वांद्रे, अंधेरी डीएन नगर, मालाड, कुलाबा, मरीन लाईन्स, चर्चगेट

पावसाची नोंद -

सांताक्रुझ - ७५.८ मिमी

कुलाबा - ८५.८ मिमी

वांद्रे - ६८.८ मिमी

दहिसर - १५९. ५ मिमी

राम मंदिर ८२. मिमी

चेंबूर - ६०५० मिमी

सीएसएमटी - ८३.५ मिमी

माटुंगा - ६९ मिमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT