मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावतीने (एमएमआरडीए) मुंबई महानगराचा कायापालट करणारी विविध प्रकल्पे हाती घेतली आहेत. कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता, शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्प होत आहेत. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.
नागरिकांचा प्रवास वेळेत, वेगवान होण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएच्या वतीने प्रकल्पांची उभारी सुरू आहे. रविवारी, ( ता. 21) रोजी वरळी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. रविवार, (ता.21) रोजीपासून या उड्डाण पुलावरील एक मार्गिका मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली आहे. शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, वांद्रे-कुर्ला सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना परवडणारी पर्यावरणपूरक वाहतूक सज्ज होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.
10 मिनिटांची होणार बचत
सध्या कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे-कुर्ला जोड रस्ता सहित इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. यामुळे वाहतुकीच्या वेळेत साधारण 10 मिनिटाची बचत होईल, असा दावा एमएमआरडीए कडून करण्यात आला आहे.
प्रकल्पाची मूळ किंमत 163.08 कोटी रुपये
प्रकल्पाची सुधारित किंमत 103.73 कोटी रुपये
या प्रकलाच्या कामाचे स्वरूप:
या प्रकल्पांतर्गत एकुण तीन मार्गिका आहेत.
शिवडी ते वरळी उन्नतमार्ग
- शिवडी – वरळी उन्नत मार्गाची लांबी सुमारे 4.5 किमी इतकी आहे.
- या प्रकल्पाची कंत्राटीय किंमत सुमारे 1051. 86 कोटी इतकी आहे.
- या प्रकल्पाचे काम 13 जानेवारी 2019 रोजी पासून सुरू करण्यात आलेले आहे.
- या प्रकल्पासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. मुंबई पार बंदर प्रकल्पावरून येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोचून वांद्रे-वरळी सागरी सेतुने वांद्र्याहून पश्चिम उपनगरात सोयीस्कररीत्या जाता येणार आहे. प्रकल्पाचा मार्ग शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन हार्बर रेल्वे मार्ग ओलांडून आचार्य दोंदे मार्गावरून, डॉ. आंबेडकर मार्ग ओलांडून, प्रभादेवी रोड स्थानकापाशी मध्य व पश्चिम रेल्वे व सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून कामगार नगर मार्ग डॉ. अँनी बेझँट मार्ग ओलांडून वरळी येथे नारायण हर्डीकर मार्गावर संपणार आहे.
वांद्रे कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन
वांद्रे कुर्ला संकुल येथील स्मार्ट वाहनतळ प्रकल्प
---------------------------------------------------
( Edited by Tushar Sonawane )
mumbai city marathi news MMRDAs projects transform Mumbai Megaplan passengers latest live update
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.