devedra fadanvis esakal
मुंबई

Coastal Road: आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही; 'उबाठाचे बाळराजे' म्हणत फडणवीसांचा निशाणा

Mumbai Coastal Road Project : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका लेनचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठावर टीका केली आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका लेनचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठावर टीका केली आहे. काही लोक श्रेय घेतल्याची टीका करत आहेत. पण, आम्ही दुसऱ्याचं श्रेय कधी लाटत नाही, असं फडणवीस म्हणाले. (Mumbai Coastal Road Project MCRP inauguration cm eknath shinde devendra fadanvsi speech)

फडणवील म्हणाले की, आज मुंबईसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण, आज आपण एक लेन सुरु करत आहोत. त्याचा प्रचंड फायदा मुंबईकरांना होणार आहे. दुसरा लेन देखील लवकरत सुरु करण्यात येणार आहे. काल सोशल मीडियावर मला पाहिला मिळालं की, उबाठाचे बाळराजे यांनी सांगितलं की हे सर्व आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे लोक घेतात.

मी आधी त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही. आम्ही आमच्याच कामाचे श्रेय घेतो. या कोस्टल रोजची संकल्पना नवीन नव्हती. अनेक वर्ष ही संकल्पना होती. मा. उद्धव ठाकरे यांनी दोन महानगरपालिकेच्या निवडणुका केवळ कोस्टर रोडचे प्रझेंटेशन दाखवून पार पाडल्या आहेत, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

२००४ ते २०१४ मध्ये यूपीएचे सरकार होते. आपल्याकडे सी-लिंक बाधण्याला परवानगी होती. पण, कोस्टल रोडची परवानगी नव्हती. यूपीए सरकारमधील नेत्यांनी याची परवानगी घेतली नाही. पण, जेव्हा मोदींचे सरकार आलं तेव्हा आम्ही पाच बैठका केल्या आणि सरकारकडून परवानगी काढून घेतली, असं फडणवीस म्हणाले.

आघाडीच्या काळात भ्रष्टाचार

काही लोक हे आमच्या काळात झाल्याचा दावा करत आहेत. पण, एका गोष्टीचं मी कौतुक करतो. अश्विनी भिडे यांनी पाठपुरावा करुन हे काम पूर्ण करुन घेतले आहे. मला एक गोष्ट आठवते. मी विरोधीपक्ष नेता होतो. त्यावेळी मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करायचे. नुसती वसुली सुरु होती. कोण आमदार होते मी हे आता बोलणार नाही. सगळ्यांनाच याची माहिती आहे असं ते म्हणाले.

हा रस्ता झाला कारण सत्ता बदल झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून हे काम झालं नाही तर अजून चारपाच वर्ष हे काम झालं नसतं. एकनाथ शिंदेंनी हे काम स्वत: हाती घेऊन पूर्ण करुन घेतलं आहे. काहीजण, नुसतं ट्वीटर, फेसबुकवरुन श्रेय घेत आहेत, असा निशाणा त्यांनी सांगितलं.

श्रेयवादासाठी कधी लढलो नाही

मी मुख्यमंत्री असताना देखील एका कोस्टल रोडचे भूमीपूजन करण्याच्या वेळी उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं नाही. पण, आम्ही श्रेयवादासाठी कधी लढलो नाही. अंडरग्राऊंड सुरु असलेली मेट्रो यांनी रोखली होती. मी मुख्यमंत्री होतो मी हा प्रकल्प त्यांच्याकडून काढून घेऊ शकलो असतो. पण, आम्हाला मुंबईकरांच्या लोकांचे कल्याण महत्त्वाचे होते. त्यामुळे कधीही हे मी बोललो नव्हतो. पण, काही लोक विनाकारण श्रेय घेताहेत म्हणून मला हे सांगावं लागत आहे, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT