मुंबई

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी 19 गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

Narayan Rane Jan Ashirwad Yatra : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईत विविध ठिकाणी 19 गुन्ह्याची नोंद झाली आहे. माहिम आणि आग्रीपाडा पोलिस स्थानकात प्रत्येकी तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सायन आणि गोवंडी पोलिस स्थानकात प्रत्येकी दोन गुन्हे नोंदवले आहेत. आझाद मैदान, शिवाजी पार्क, दादार, चेंबूर, विले पार्ले, खैरवाडी आणि विमानतळ पोलिस स्थानकासह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये, गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मुंबईत वातावरण चांगलेच तापले होते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भविष्यातही वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजप मुंबई निवडणुकीत शिवसेनाचा सामना करणार असल्याचं सध्या चित्र दिसत आहे.

सात गुन्हे दाखल करा नाहीतर 70 हजार, मला फरक पडत नाही- राणे

यापूर्वी सभा, बैठका झाल्या नाहीत काय, हे मला माहित नाही का, मग आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का केली, सात गुन्हे दाखल करा की सत्तर की सत्तर हजार, मला काहीच फरक पडत नाही,असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. ही यात्रा आम्ही जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आयोजित केली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे कार्यक्रम झाले तिथे नियमांचे उल्लंघन झाले नव्हते काय? त्यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, याकडेही राणे यांनी लक्ष वेधले.

नवी मुंबईतही जन आशीर्वाद यात्रेवर कारवाई

भाजपाच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह ७० ते ८० भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT