मुंबई : राज्यासह मुंबईतील (Mumbai) कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) नियंत्रणात येत असल्याने दिलासा मिळत असला तरी लहान मुलांचे कोरोनाबाधित (corona infection to children) होण्याचे प्रमाण अजूनही नियंत्रणात नाही. कारण, राज्यातील 0 ते 10 वयोगटातील कोरोनाबाधित लहान मुलांनी 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील 1 ऑगस्टपर्यंत 0 ते 10 या वयोगटातील 2 लाख 305 एवढ्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग (Corona infection) झाला आहे. दरम्यान, 18 दिवसांत तब्बल 5 हजार नव्या बाधितांची (new corona patients) नोंद या अहवालात करण्यात आली आहे. (Mumbai-corona second wave-corona infection to children-Corona infection-new corona patients-nss91)
वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभागाने 14 जुलै 2021 या दिवशी प्रसिद्ध केलेल्या अहवालात 1 लाख 95 हजार 109 एवढ्या लहान मुलांची नोंद झाली होती. ही संख्या वाढून 28 जुलै या दिवशी 1 लाख 99 हजार 281 वर पोहोचली. तर, 1 ऑगस्ट 2021 ला या आकड्याने 2 लाखांचा टप्पा पार केला. जवळपास 18 दिवसांत 5 हजार 196 नव्या बाधितांची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.
10 वर्षांपर्यंत 1% पेक्षा कमी मुलांना कोरोनाची लागण
0 ते 10 वयोगटातील लहान मुलांचे 1 टक्क्यांपेक्षा कमी बाधित होण्याचे प्रमाण राज्याच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. ही जरी दिलासादायक बाब असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका हा लहान मुलांना सर्वाधिक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम जास्त झालेला नसला तरी हा आलेख चढाच आहे. अहवालानुसार, आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच 0.92 टक्के 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 10 वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या 2 कोटी 15 लाखांच्या जवळपास आहे. यापैकी 2 लाख 305 मुलांना संसर्ग झाला आहे. तर 11 ते 20 या वयोगटातील मुलांना एकूण लोकसंख्येच्या केवळ 2.14 टक्के संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रात 11 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या 2,16,36,988 आहे, त्यापैकी फक्त 4 लाख 63 हजार 770 मुलांना संसर्ग झाला आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले की, मुलांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने कोरोनाचा जास्त परिणाम त्यांच्यावर झालेला नाही. मुंबईतही कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकूण संक्रमित झालेल्यांपैकी 10 वर्षांखालील 1.85 टक्के मुलांना संसर्ग झाला आहे.
पालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 15 महिन्यांत 10 वर्षापर्यंतच्या 13, 168 मुलांना संसर्ग झाला आहे. यातील 55 टक्के मुले आणि 45 टक्के मुली आहेत. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती मजबूत असते. त्यामुळे, कोरोनाच्या संसर्गाचा जास्त परिणाम त्यांच्यावर होत नाही.
सायन रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत गबाळे यांनी सांगितले की, कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या लहान मुलांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे आढळली नाहीत. उपचारासाठी दाखल झालेल्या मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे, त्यांच्या मृत्यूंचे प्रमाणही कमी आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुलांवर नुकत्याच झालेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये 51 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडी आढळली आहेत. यातून हे समजले आहे की या मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. आतापर्यंत मुलांना जास्त धोका झालेला नाही आणि पुढेही त्यांना जास्त त्रास होणार नाही.
0 ते 10 वयोगटातील बाधित लहान मुले
13 मे - 1 लाख 58 हजार 660
13 जून - 1 लाख 84 हजार 220
13 जुलै - 1 लाख 95 हजार 109
28 जुलै - 1, 99, 281 0.90%
1 ऑगस्ट- 2,00, 305
18 दिवसांत 5,196 नव्या बाधितांची नोंद
11 लाखांहून अधिक तरुण बाधित
दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे 21 ते 30 वयोगटातील तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत 11 लाख 34 हजार 614 एवढ्या तरुणांना बाधा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या 13 जुलै या दिवशी 11 लाख 10 हजार 736 एवढी होती. जवळपास 30 हजार नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.