corona-mumbai 2.jpg 
मुंबई

मुंबईत नव्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

धारावीत पुन्हा दोन नवे रूग्ण; मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू

सकाळ वृत्तसेवा

धारावीत पुन्हा दोन नवे रूग्ण; मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू

मुंबई: राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या स्तरांमध्ये मुंबईचा समावेश पहिल्या अथवा दुसऱ्या स्तरात येत आहे. पण असे असले तरी मुंबईत सध्या तरी तिसऱ्याच स्तरावरील निर्बंध लागू केले जातील असं स्पष्टीकरण मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिलं आहे. अशातच गेल्या २४ तासांत मुंबईत 696 नवीन रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,20,637 इतकी झाली आहे. मुंबईत 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,88,340 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 67,86,802 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. (Mumbai Corona Update 696 new cases found 709 discharged)

मुंबईत आज दिवसभरात 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 279 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 8 पुरुष तर 5 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांचे वय 40 च्या खाली होते. 1 रुग्णाचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 10 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.तर रुग्ण दुपटीचा कालावधी 720 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 14,751 हजारांवर आला आहे.

मुंबईत 18 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 82 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6,809 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 848 करण्यात आले.

धारावीत 2 नवीन रुग्ण

धारावीमध्ये 2 रुग्ण आढळले. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 6866 झाली आहे. माहीममध्ये 9 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्ण 9915 झाले आहेत. दादर मध्ये 7 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा 9581 वर पोचला आहे. जी उत्तर मध्ये आज 18 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,362 झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT