corona patient sakal media
मुंबई

मुंबईतील सक्रिय रुग्णांमध्ये घट; कोरोना नियम पाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

एका महिन्यात 60 टक्के घट

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील एकूण रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. 250 ते 300 च्या दरम्यान आढळणाऱ्या रुग्णसंख्येमुळे (corona patients) पालिकेवरचा (BMC) भार कमी जरी होत असला तरी ओमायक्रॉन नावाच्या कोरोनाच्या म्युंटटमुळे (Omicron corona variant) पालिका सध्या कामाला लागली आहे. त्यातच एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील सक्रिय रुग्ण सातत्याने घटत (corona Active patients decreases) आहेत.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, 1 ऑक्टोबरपासून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या महिन्यात सक्रिय रुग्णांमध्ये जवळपास 60 टक्के घट झाली आहे. मुंबईत 1 ऑक्टोबर या दिवशी 4,810 सक्रिय रुग्ण होते. ही संख्या घटून 14 डिसेंबरपर्यंत 1769 पर्यंत कमी झाली आहे.  तर, 1 डिसेंबर रोजी ही संख्या 1,904 आणि 14 डिसेंबर रोजी 1769  पर्यंत घसरली. गेल्या 30 दिवसांत, सक्रिय रुग्णांमध्ये सरासरी 52.67 टक्क्यांनी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी कौतुक केले असून कोविड नियम पाळण्यावर भर देण्याचा सल्लाही सोबत दिला आहे.

कोविड 19 मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसंच, बरेचसे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  एक काळ असा होता जेव्हा सक्रिय रुग्णांची संख्या 97,000 वर गेली होती. पण, यावरुन ही संख्या 1800 पर्यंत आणणे ही एक चांगली कामगिरी असून पालिकेच्या उपाययोजनांना यश येत आहे. मात्र, हि दिलासादायक बाब असली तरी आपले शस्त्र खाली ठेऊन बिनधास्त होऊ नये. “मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा, गर्दीची ठिकाणे टाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरण करा. व्हायरस आणि त्याच्या प्रकारांवर मात करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असेही डॉ. सुपे म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, पालिकेने आधीपासून विशेषत: सणासुदीच्या काळात कोविड-19 रुग्णांवर बारीक नजर ठेवली आहे. शहरात मिशन सेव्ह लाइव्ह्जची कडक अंमलबजावणी केली होती. आमचे मुख्य लक्ष दैनंदिन संख्या कमी करणे आणि मृत्यूंची संख्या एक अंकी करणे हे आहे. त्यासाठी लागणारी सर्व सुविधाही सज्ज आहेत. यात जंबो सुविधांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

लसीकरण आणि कोविडसाठी खासगी रुग्णालयांचे मुख्य समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, लसीकरणाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे कारण ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे, त्यांना लसीकरण करण्यात आले आहे. असे दिसून आले आहे की लसीकरण केलेले लोक कोणत्याही किंवा सौम्य लक्षणांशिवाय बरे होत आहेत. ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत आणि तरीही त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही. त्यामुळे, जास्तीत जास्त लसीकरण झाले पाहिजे.

सक्रिय रुग्णांचा ट्रेंड

1 ऑक्टोबर - 4,810

1 नोव्हेंबर - 3,689

15 नोव्हेंबर - 2775

30 नोव्हेंबर - 2052

1 डिसेंबर - 1,904

14 डिसेंबर 1,769

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT