Corona patients sakal media
मुंबई

मुंबईतील कोविड रुग्णांमध्ये 15 टक्क्यांनी घट

उपचार प्रोटोकॉल आणि सर्वाधिक लसीकरणामुळे घट

भाग्यश्री भुवड

मुंबई : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोविड -19 च्या संसर्गामध्ये (corona infection) थोड्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आता मुंबईतील सक्रिय प्रकरणांची संख्या (corona active cases) गेल्या सात दिवसांत 14.42 टक्क्यांनी कमी झाली आहे. 14 ऑक्टोबर रोजी 5,317 सक्रिय रुग्ण होते, ही संख्या 20 ऑक्टोबरपर्यंत 4,550 पर्यंत खाली आली आहे.

पालिका अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, रिकव्हरी दर हा एक महत्त्वाचा घटक असून आता उपचार प्रोटोकॉल बदलल्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे उपचार होते आहेत. शिवाय, पात्र लोकसंख्येपैकी 97 टक्के लोकांचे अंशत: लसीकरण करण्यात आले आहे.पालिकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, विषाणूचा प्रसार नियंत्रित झाला आहे आणि त्यापैकी बहुतेक लोकांमध्ये प्रतिपिंडे विकसित झाली आहेत. एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, “ गेल्या दोन आठवड्यांत नवीन संक्रमणांच्या दरात घट झाली आहे, 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान शहरात नवीन संसर्गाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण अधिक  आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या म्हणण्यानुसार, सक्रिय रुग्णांमध्ये घट झाल्याने कोविड -19 रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसते.  सक्रिय रुग्णांमध्ये झालेली घट हे सूचित करते की आम्ही साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहोत. आम्ही चाचण्यांचे प्रमाण, रुग्णांना त्वरित वेगळे करणे, तसेच वेळेवर औषधोपचार यामुळे संख्या कमी करण्यात सक्षम आहोत.

चढता उतरता आलेख

दरम्यान, या आठवड्यात जरी सक्रिय कोविड रुग्णांमध्ये घट झालेली दिसत असली तरी 21 ऑगस्ट ते 21 ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईमध्ये सक्रिय कोविड -19 रुग्णांमध्ये 78% वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सरासरी 2,800 रुग्ण होते, या महिन्यात हीच संख्या 5,000 हून अधिक आहे. 21 ऑगस्ट रोजी, मुंबईत 2,988 सक्रिय कोविड -19 रुग्ण होते, जी सप्टेंबरमध्ये त्याच तारखेला 4,583 आणि नंतर 21 ऑक्टोबर रोजी 5,328 वर पोहोचली. म्हणजेच कोविड रुग्णांचा सध्या चढता-उतरता आलेख पाहायला मिळत असल्याने नागरिकांनी कोविड वागणूकीकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात.  

वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, दुसऱ्या लाटेची शेपूट जाड आणि लांब आहे. अनेक लाटा येतील. पण, त्याची तीव्रता नागरिकांच्या वागणुकीवर आणि सरकारवर अवलंबून असते. नागरिकांनी योग्य कोविड वर्तन स्वीकारावे पाहिजे, सोबतच भविष्यातील लाटांच्या अपेक्षेने सरकारने सर्व वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवल्या पाहिजेत."

सक्रिय रुग्णांचा आलेख (14 ते 22 ऑक्टोबर)

14 ऑक्टोबर - 5317

15 ऑक्टोबर - 5,379

16 ऑकटोबर - 5,183

17 ऑक्टोबर - 5030

18 ऑक्टोबर - 4,853

19 ऑक्टोबर - 4,650

20 ऑक्टोबर - 4,550

21 ऑक्टोबर- 4,537

22 ऑक्टोबर - 4,461

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT