Corona patients sakal media
मुंबई

मुंबईत ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे 89 टक्के रुग्ण; जाणून घ्या सविस्तर माहिती

जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीचे निष्कर्ष जाहीर

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोविड विषाणूच्या (corona virus) जनुकीय सूत्राचे निर्धारण करणाऱ्या चाचणीचे निष्कर्ष (Genome sequencing test) जाहीर केले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिएंट’चे 11 टक्के (Delta variant patients) तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे 89 टक्के रुग्ण (Delta derivative patients) आढळले आहेत. तसेच, ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचे फक्त 2 रुग्ण (Omicron patients) संकलित नमुन्यांच्या संख्येत 1 टक्क्यांपेक्षाही कमी आढळले आहेत.

चाचणीच्या पाचव्या तुकडीमध्ये मुंबईतील 221 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यातील एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या पाचव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 277 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 221 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. मुंबईतील 221 रुग्णांपैकी 19 रुग्ण (9 टक्के) हे 0 ते 20 वर्षे आतील वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 69 रुग्ण (31 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 73 रूग्ण (33 टक्के), 61 ते 80 वयोगटात 54 रुग्ण (25 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील 6 रुग्ण (3 टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.

चाचणीतील निष्कर्षानुसार, 221 पैकी 24 रुग्ण (11 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिएंट’ तर 195 रुग्ण (89 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोघे जण ओमायक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण संकलित नमुन्यांच्या संख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

या 221 पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या 26 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या 47 पैकी 12 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने, या 221 पैकी कोणाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे. एकूण 221 रुग्णांपैकी, 13 जणांचे वय वय वर्ष 18 पेक्षा कमी आहे. पैकी 2 जणांना ‘डेल्टा व्हेरिएंट’ आणि 11 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

चाचणीच्या निष्कर्षावरून मुंबईतील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. असे असले तरी, नवीन ओमिक्रॉन विषाणू प्रकाराचा वेगाने प्रसार होण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला इशारा लक्षात घेता, सर्वांनी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन यापुढेही कठोरपणे करणे आवश्यक आहे. सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील आवश्यक आहे असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: आज मतदान! प्रत्येक क्षणाची अपडेट वाचा एका क्लिकवर

Panchang 20 November: आजच्या दिवशी विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा

केंद्रांवरील हालचालींवर पोलिसांच्या ड्रोन अन्‌ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष! सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 11000 पोलिसांचा बंदोबस्त, चहा-नाष्टा, जेवण जागेवरच

आजचे राशिभविष्य - 20 नोव्हेंबर 2024

घरबसल्या शोधा मतदार यादीत तुमचे नाव! नाव शोधण्यासाठी ‘हे’ ३ पर्याय; आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ; मतदान कार्ड नसेल तरी करता येईल मतदान, वाचा...

SCROLL FOR NEXT