मुंबई : मुंबईतील रुग्णसंंख्या (corona patients) दिवसेंदिवस वाढत असून एका महिन्यात होम आयसोलेशनमध्ये (home isolation) असणाऱ्यांची संख्याही दुप्पट झाली आहे. मुंबईत सध्या 72 हजारांहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार (bmc report), गेल्या महिन्याभरात, संपूर्ण मुंबईत होम आयसोलेशनमध्ये नागरिकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याचवेळी, शहरात बेड्सची उपलब्धता (beds availability) 86% वरून 90% पर्यंत वाढली असली तरी शहरात दररोज नोंदल्या जाणाऱ्या प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे.
कोविड प्रोटोकॉलनुसार, होम क्वारंटाईन किंवा आयसोलेशनमध्ये असलेले कोविड -19 रुग्ण सौम्य किंवा कोणतीही लक्षणे नसलेले किंवा उच्च-जोखीम आणि कमी-जोखीम असलेल्या संपर्कातील आहेत. आकडेवारीनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात शहरात 300 ते 350 दरम्यान रुग्णांची नोंद केली जात होती ती संख्या आता 450-550 वर पोहोचली आहे. 23 ऑगस्ट रोजी 31,382 नागरिक होम क्वारंटाईन अंतर्गत होते, जे आता प्रमाण वाढले असून 28 सप्टेंबरपर्यंत 72,460 वर पोहोचले आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी होम क्वारंटाईन अंतर्गत नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण विविध घटकांना दिले आहे - तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ आणि त्यानंतर अंशतः लसीकरण केलेल्या नागरिकांना संसर्ग झाला, परंतु त्यांना सौम्य लक्षणे असल्याने ते होम क्वारंटाईनसाठी पात्र आहेत. तसंच, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 14 दिवसांचे होम क्वारंटाईन नियम ही होम अलगावमध्ये नागरिकांची संख्या दुप्पट होण्याची काही कारणे आहेत.
पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की , 'आम्ही संपर्क ट्रेसिंग वाढवले आहेत, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक पाॅझिटिव्ह रुग्णामागे 20 लोकांना शोधत आहोत, ज्यामुळे, होम आयसोलेशनअंतर्गत नागरिकांची संख्या वाढली असेल. तसेच, दुसरे कारण म्हणजे सप्टेंबरपासून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अलगीकरणात ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.