Mumbai Corona Update International Passengers Test corona Positive At Mumbai Airport  
मुंबई

Mumbai Corona Update : मुंबईकरांची चिंता वाढली! परदेशातून आलेला प्रवासी आढळला करोना पॉझिटिव्ह

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Corona Update : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरात सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच या पार्श्वभूमिवर सर्व सरकारी यंत्रणा देखील हाय अलर्टवर आहेत. प्रशासनाकडून कोरोना बाबत कठोर पावले उचलली जात असताना मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या नागरिकाची कोरना चाचणी पॉझिटिव्ह आढळ्याचे समोर आल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

मुंबईत दिवसभरात ९ रुग्णांची नोंद

मुंबईतून कोरोना हद्दपार होण्याची चिन्हे दिसू लागली असून गुरुवारी दिवसभरात ०९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार ११७ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४६ वर स्थिरावली आहे.

दरम्यान, दिवसभरात ०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ३२१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे ५० सक्रिय रुग्ण आहेत.

परदेशातून आलेला प्रवासी २८ डिसेंबर रोजी मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान हा प्रवासी नेमका कोणत्या देशातून आला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. चीनमधल्या कोरोनाच्या बातम्यांनी जगभरात दहशत पसरली आहे असताना अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. भारत सरकारनेही याबाबत कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

चीनसह अमेरिका, जपान दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज मोठा निर्णय घेऊन सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

१ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय. त्यांना प्रवासापूर्वी आपला रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल असं ट्विट आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT