corona vaccine sakal media
मुंबई

लस तुटवड्याचा फटका ; 7 महिन्यांत केवळ 20 % लसीकरण

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत (Mumbai) लसीकरणाचा (corona vaccination) वेग मे महिन्या नंतर कमी झाला असून जुलै महिन्यात (July average) सरासरी 20 टक्के कमी लसीकरण झाले. मे महिन्यात 34 टक्के लसीकरण झाले. लसींचा तुटवडयाचा ( vaccination stock) फटका लसीकरणाला बसला (impact on vaccination) असल्याचे दिसते.

मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन 7 महिने उलटले. मात्र गेल्या 7 महिन्यांत 20 टक्के मुंबईकरांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. मात्र अपुऱ्या लस पुरवठ्याने लसीकरणावर परिणाम होत असल्याची तक्रार होत आहे. पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, काही महिन्यांत जास्त लसीकरण होत आहे तर काही महिन्यांत अगदीच कमी लसीकरण झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.

मुंबई महानगरपालिकेला सुरुवातीपासून आतापर्यंत 49 लाखांहून अधिक लसीचे डोस मिळाले आहेत. यातील सुरुवातीला खासगी लसीकरण केंद्रांना 5 लाखांपेक्षा जास्त डोसचे वाटप करण्यात आले आहे. 16 जानेवारी ते 2 ऑगस्ट पर्यंत पालिका केंद्रांमध्ये लोकांना 38,22,770 डोस देण्यात आले आहेत तर सरकारी केंद्रांवर लाभार्थ्यांना 4,19,196 डोस देण्यात आले आहेत. तर खासगी केंद्रांवर 30 लाखांहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबईत मे महिन्या नंतर लसीकरणाचा वेग मंदावला. जुलै महिन्यात 20 टक्के कमी लसीकरण झाले. तर, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात 34 टक्के लसीकरण झाले. पालिका आरोग्य विभागाने दररोज जाहीर केलेल्या लसीकरण अहवालानुसार, जानेवारी महिन्यात दररोज सरासरी 1300 लाभार्थींना लसीचे डोस दिले जात होते. तर, फेब्रुवारीमध्ये हीच संख्या 6 हजारांवर आली होती. तर मार्चमध्ये रोजची सरासरी 31 हजार तेच एप्रिलमध्ये वाढून 42 हजारांपर्यंत पोहचली होती. मे मध्ये 28 हजारावरील संख्या जूनमध्ये 71 हजारांपर्यंत वाढली. तर जुलै महिन्यात लाभार्थींची संख्या 59 हजारांपर्यंत खाली आली.

कोणत्या महिन्यात किती लसीकरण :

जानेवारी - 39690

फेब्रुवारी- 1,81,620

मार्च - 9,31,664

एप्रिल- 12,75,652

मे- 8,47,415

जून - 21,59,690

जुलै - 17,88,132

मुंबईला मिळालेले डोस:

जानेवारी - २,६५,००० 2,65,000

फेब्रुवारी- 5,71,000

मार्च - 8,10,950

एप्रिल- 9,47,500

मे- 5,23,440

जून - 7,39,190

जुलै - 9,83,390

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT