Praful Patel 
मुंबई

Praful Patel: प्रफुल्ल पटेलांना कोर्टाचा मोठा दिलासा! ईडीने जप्त केलेली मुंबईतील 180 कोटींची घरे परत मिळणार

Praful Patel Mumbai court: मुंबईच्या SAFEMA कोर्टाने ईडीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे पटेल यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मुंबई कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने पटेल यांचे १८० कोटी किंमतीचे मुंबईतील दोन घरं जप्त केले होते. याप्रकरणी मुंबईच्या SAFEMA कोर्टाने ईडीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे पटेल यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

ईडीने दक्षिण मुंबईतील वरळी येथील पटेल यांच्या मालकीचे सीजे हाऊसचे बाराव्या आणि तेराव्या मजल्यावरील दोन घरे जप्त केली होती. या दोन घरांची किंमत जवळपास १८० कोटी आहे. हे दोन्ही फ्लॅट प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा आणि कुटुंबियांच्या नावे नोंद आहेत.

ईडीने असा दावा केला होता की, ही संपत्ती बेकायदेशीरपणे इक्बाल मिरचीची पहिली पत्नी हजरा मेनन हिच्याकडून घेण्यात आली होती. इक्बाल मिरची हा ड्रग माफीया आणि गँगस्टर दाऊद इब्राहिम यांचा उजवा हात आहे. मिरची हा १९९३ मधील मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषी आहे. त्याचा मृत्यू लंडनमध्ये २०१३ मध्ये झालाय.

कोर्टाने ईडीचा आदेश रद्द केला आहे. कोर्टाने स्पष्ट केलंय की, तपास यंत्रणेने प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीविरोधात केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. कारण, या संपत्तीचा आणि मनी लाँड्रिंगचा काही संबंध नाही. शिवाय ही घरे मिरची याच्याशी संबंधित असल्याचं समोर आलेलं नाही.

कोर्टाने पुढे म्हटलं की, '१४००० स्क्वेअर फुटाचे मेनन आणि त्याच्या दोन मुलांची सीजे हाऊसमधील संपत्ती स्वतंत्रपणे जप्त केलेली आहे. दोघांना यापूर्वीच फरार म्हणून घोषित केले आहे.' कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी पुन्हा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये गेल्यावर सर्वजण स्वच्छ होतात, अशी टीका विरोधकांनी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, 'या निर्णयामुळे ईडी, सीबीआय भाजपचा अंग असल्याचं स्पष्ट होत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT