मुंबई: गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात कोर्टासमोर हजर होण्यासाठी अंधेरीतील महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंगना रणौतला शेवटची संधी दिली आहे. पुढच्या सुनावणीला कंगना कोर्टात हजर राहिली नाही, तर तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट बजावणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. (Mumbai court warns Kangana Ranaut with arrest warrant must be present at Javed Akhtar case hearing dmp82)
कंगना देशामध्ये नाहीय, त्यामुळे २७ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीला ती हजर राहू शकत नाही, असे कंगनाच्यावतीने तिच्या वकिलाने कोर्टाला सांगितले. तिने कोर्टात व्यक्तीगत हजर राहण्यापासून सवलत मागितली होती. कंगनाच्या अनुपस्थितीला जावेद अख्तर यांचे वकिल जय भारद्वाज यांनी कडाडून विरोध केला. कंगना एकाही तारखेला सुनावणीसाठी हजर राहिलेली नाही, त्यामुळे तिच्याविरोधात वॉरंट काढण्याची त्यांनी न्यायालयाकडे विनंती केली.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आणि कोरोनाकाळात SOP असल्यामुळे अंधेरीचे महानगर दंडाधिकारी आर.आर.खान यांनी आजच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची कंगनाला मुभा दिली. पण पुढच्या सुनावणीच्या तारखेला कंगना पुन्हा गैरहजर राहिली, तर तिच्याविरोधात वॉरंट बजावणार असल्याचं आर.आर.खान यांनी स्पष्ट केलं.
आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत कंगना राणौतची वक्तव्य बदनामीकारक असून ती गुन्हा ठरतात,असे जावेद अख्तर यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी कंगना विरोधात महानगर दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केलीय. जावेद अख्तर हे बॉलिवूडच्या सुसाईड गँगचा एक भाग आहेत, असे वक्तव्य कंगनाने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. २०२० मध्ये सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असताना कंगनाने हे विधान केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.